शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदाराची हकालपट्टी, एसटीच्या जागेचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 04:04 IST

अंबरनाथ रेल्वेस्थानक परिसरातील एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागेवरील बेकायदा वाहनतळ विनापरवाना पावतीपुस्तकाचा वापर करत दुचाकी वाहनचालकांकडून पार्किंगचे शुल्क आकारले जात होते.

अंबरनाथ : अंबरनाथ रेल्वेस्थानक परिसरातील एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागेवरील बेकायदा वाहनतळ विनापरवाना पावतीपुस्तकाचा वापर करत दुचाकी वाहनचालकांकडून पार्किंगचे शुल्क आकारले जात होते. या बेकायदा पार्किंगबाबत ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध झाली. या बातमीची दखल घेत एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ पावले उचलत या कंत्राटदाराची हकालपट्टी केली आहे.अंबरनाथ रेल्वेस्थानकाच्या पश्चिम भागात असलेल्या आणि विठ्ठलवाडी एसटी आगाराच्या अखत्यारित असलेल्या एसटी आगाराची जागा पडून आहे. या जागेवर शहरातील नगरपालिकेची पार्किंगची जागा कमी पडू लागल्याने अंबरनाथ रेल्वेस्थानकाच्या पश्चिम भागातील विठ्ठलवाडी एसटी आगाराच्या अखत्यारित असलेल्या एसटी डेपोच्या जागेवर दोन्ही बाजूंनी बेशिस्तपणे दुचाकी उभ्या केल्या जातात. यामुळे तेथे वाहतूककोंडी होते. त्यात अंबरनाथ पश्चिम भागात स्टेशन परिसरात एसटी महामंडळाच्या भूखंडावर पूर्वीच्या कंत्राटदाराकडून पार्किंग बंद केले होते. मात्र, अद्याप एसटी महामंडळाकडून नवीन पार्किंगसाठी कुठल्याही प्रकारची निविदा काढली नव्हती.या जागेवर एका कंत्राटदाराकडून दुचाकी वाहनचालकांना बेकायदेशीरपणे जुन्या कंत्राटदाराच्या नावावरील एसटी महामंडळाच्या पावतीपुस्तकाचा आधार घेत, दुचाकीचालकांकडून पार्किंगचे शुल्क वसूल करत होता. तसेच ज्या जुन्या ग्राहकांना तीन महिन्यांचे पार्किंगचे पास काढले होते.त्या ग्राहकांना जुना कंत्राटदार सोडून गेल्याने पुन्हा नवीन पास काढण्याची सक्ती या कंत्राटदाराकडून केली जात होती. अखेर, याप्रकरणी एसटी महामंडळाच्या अधिकाºयांशी संपर्ककेला असता, धक्कादायक माहिती समोर आली.एसटी महामंडळाच्या या भूखंडावर नवीन पार्किंगसाठी अद्याप निविदाच काढली नसल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाºयांनी दिली. त्यामुळे येथे सुरू असलेले पार्किंग बेकायदेशीरपणे सुरू असून कंत्राटदाराकडून वाहनचालकांची लूट सुरू असल्याचे काहींनी समोर आणले.आता विनाशुल्क पार्किंगयाबाबत ‘लोकमत’ने बातमी प्रसिद्ध केली असता, या बातमीची दखल एसटी महामंडळाच्या अधिकाºयांनी घेत तत्काळ याप्रकरणी हालचाली करत दुचाकी वाहनचालकांकडून बेकायदा वसुली करणाºया कंत्राटदाराची हकालपट्टी केली आहे. त्यामुळे या जागेवर आता शहरातील नागरिक विनाशुल्क पार्किंग करत आहेत.

टॅग्स :thaneठाणे