शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदार उचलणार कचरा; केडीएमसीचे कर्मचारी अपुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 02:59 IST

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दहापैकी पाच प्रभाग क्षेत्रांतील कचरा उचलण्यासाठी निविदा काढली आहे

कल्याण : केडीएमसी हद्दीतील कचरा उचलण्याचे काम महापालिकेचे सफाई कामगार करतात. मात्र, त्यांची संख्या अपुरी असल्याने महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दहापैकी पाच प्रभाग क्षेत्रांतील कचरा उचलण्यासाठी निविदा काढली आहे. खाजगीकरणाचा प्रस्ताव यापूर्वीच महासभेत मंजूर झाला आहे.महापालिका हद्दीतून दररोज ६४० मेट्रीक टन कचरा उचलला जातो. मात्र, महापालिकेचे सफाई कामगार कमी आहेत. त्यामुळे कचरा उचलला जात नसल्याच्या तक्रारी नागरिक व लोकप्रतिनिधी करत आहेत. महापालिकेच्या दहापैकी पाच प्रभाग क्षेत्रांतील कचरा उचलण्याचे काम खाजगी कंत्राटदाराकडून करण्यासाठी निविदा मागवली आहे. कचरा उचलण्यासाठी कंत्राटदार प्रतिकिलो अथवा मेट्रीक टनामागे किती दर आकारणार, त्याचा तपशील कंत्राटदाराने नमूद करावा, असे महापालिकेने निविदेत म्हटले आहे. कमी दराच्या निविदाधारकास हे काम दिले जाणार आहे. महापालिकेने यापूर्वीही कचरा खाजगीकरणाची निविदा काढली होती. मात्र, तिला दोनच कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे निकोप स्पर्धा झाली नाही. आता पुन्हा नव्याने दुसऱ्यांदा निविदा मागवण्यात आली आहे. या निविदेला दोघांचा प्रतिसाद मिळाल्यास आणि दर कमी असलेल्या कंत्राटदारास कंत्राट दिले जाईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.महापालिकेकडे २२०० सफाई कामगार आहे. सरकारच्या निकषानुसार एक लाख लोकसंख्येसाठी ५०० सफाई कामगार हवेत. परंतु, या निकषात सरकारने फेरबदल करून एक लाख लोकसंख्येसाठी २५० सफाई कामगार हवेत, असा निकष जाहीर केला. २०११ च्या जनगणनेनुसार महापालिकेची लोकसंख्या १२ लाख, तर २७ गावांची लोकसंख्या तीन लाख होती. २७ गावे महापालिकेत आल्याने महापालिकेची लोकसंख्या १५ लाख झाली. जनगणना होऊन सात वर्षे उलटून गेली. दरम्यानच्या काळात वाढलेली लोकसंख्या पाहता महापालिका हद्दीत आजमितीस १८ लाख लोकसंख्या आहे. २०११ च्या जनगणनेनुसार महापालिकेत तीन हजार ७०० सफाई कामगार, तर १८ लाखांच्या लोकसंख्येनुसार सध्या साडेचार हजार सफाई कामगार हवेत. नवी भरतीअभावी हा निकष सरकारी आदेशानुसार केवळ कागदावरच आहे. सफाई कामगार कमी असल्याने कचरा उचलण्याच्या कामावर ताण पडतो.महापालिकेकडे कचरा उचलून नेण्यासाठी ६० वाहने आहेत. आणखी १६ वाहनेखरेदीचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. या १६ गाड्यांच्या खरेदीवर अडीच कोटी खर्च होणार आहेत. सध्याच्या ६० कचरावाहक गाड्यांपैकी काही गाड्या भंगार झाल्या आहेत. त्या निर्लेखित करण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी दिली.कर्मचारी अन्य प्रभागांत वळवणारपाच प्रभाग क्षेत्रांतील खाजगीकरण झाल्यास तेथील कामगार अन्य पाच प्रभाग क्षेत्रांत सफाईसाठी वळवले जातील. अपुºया मनुष्यबळाअभावी सध्या २७ गावांत योग्य प्रकारे कचरा उचलला जात नाही.महापालिका कचरा उचलण्याच्या कामावर वर्षाला १२ कोटी रुपये खर्च करते. पाच प्रभाग क्षेत्रांतील कचरा उचलण्याचे खाजगीकरण झाल्यास त्यावर जवळपास आठ ते दहा कोटी रुपये खर्च होऊ शकतो.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नkalyanकल्याण