शहरं
Join us  
Trending Stories
1
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
2
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
3
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
4
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
5
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
6
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
7
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
8
"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
9
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
10
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
11
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
12
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
13
अलर्ट! पैसे दुप्पट करण्याची हाव; एक मेसेज अन् गमावली आयुष्यभराची कमाई, करू नका 'ही' चूक
14
लग्नानंतर नवऱ्याने काम करु दिलं नाही तर...? रिंकू राजगुरु म्हणाली, "तो हिसकावून घेत असेल..."
15
Nashik Municipal Corporation Election : भाजपत एकमेकांवर मात; शिंदेसेनेला राष्ट्रवादीची साथ; गिरीश महाजन नाशकात तळ ठोकणार
16
सेना, मनसे एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी दुसरीकडे; महाविकास आघाडीत फाटाफुटीची शक्यता
17
"रहमान डकैतचे पाकिस्तानवर उपकार आहेत...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर गँगस्टरच्या वकील मित्राची प्रतिक्रिया, म्हणाला...
18
"तो त्याच्याच धुंदीत असतो...", 'दृश्यम ३'मधून अक्षय खन्नाच्या एक्झिटनंतर त्याच्या विचित्र स्वभावाबाबत अरशद वारसीचा खुलासा
19
Travel : काश्मीर फिरायला जायचं प्लॅनिंग करताय? मग 'या' ५ चुका टाळा, नाहीतर खिशाला लागेल कात्री!
20
तिकीट कापले? काळजी नको, प्रमोशन मिळेल; गिरीश महाजनांचे बंडखोरी रोखण्यासाठी आश्वासन
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी सफाई कामगार पुन्हा कामबंद आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 20:50 IST

दोन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी कल्याण डोंबिवली  महापालिकेच्या कंत्रटी सफाई कामगारांनी सोमवारी सकाळपासून पुन्हा कामबंद आंदोलन केले. त्यामुळे सकाळच्या पहिल्या सत्रत काही काळ तणाव निर्माण झाला होता, परंतू वाहनांचे नुकसान केले तर फौजदारी कारवाई केली जाण्याची तंबी मिळाल्याने आंदोलकांनी खंबाळपाडा आगाराच्या भुखंडावर ठिय्या केला होता.

डोंबिवली - दोन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी कल्याण डोंबिवली  महापालिकेच्या कंत्रटी सफाई कामगारांनी सोमवारी सकाळपासून पुन्हा कामबंद आंदोलन केले. त्यामुळे सकाळच्या पहिल्या सत्रत काही काळ तणाव निर्माण झाला होता, परंतू वाहनांचे नुकसान केले तर फौजदारी कारवाई केली जाण्याची तंबी मिळाल्याने आंदोलकांनी खंबाळपाडा आगाराच्या भुखंडावर ठिय्या केला होता. अखेरीस महापालिका अधिका-यांनी पोलिस बळाचा वापर करत आरसी वाहने रस्त्यावर आणून स्वच्छतेला सुरूवात केली.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार संघटनेच्या माध्यमाने हे आंदोलन केले जात असून पंधरवडय़ापूर्वीही कामबंद आंदोलन केले होते. त्यावेळी विशाल सव्र्हीस या पुण्याच्या ठेकेदाराने तीन महिन्यांचा पगार थकीत केला होता. त्यावेळी आयुक्त गोविंद बोडके यांनी मध्यस्थि करत ठेकेदाराला पगार देण्यास सांगितले होते. तसेच वेतनासाठी ठेकेदाराच्या 1 कोटी 27 लाखांपैकी 6क् लाखांचा निधी देण्यात आला होता. त्यानूसार ठेकेदाराने कामगारांचे एका महिन्याचे वेतन दिले होते, तसेच उर्वरीत वेतन गेल्या आठवडय़ात  सोमवारी होणो अपेक्षित होते. मात्र महापालिकेने ठेकेदाराचे उरलेले 67 लाख अदा न केल्याने ठेकेदाराने दोन महिन्यांचे वेतन थकवले. अखेरीस सोमवारी कंत्रटी कामगारांनी इशारा देत सकाळपासून आंदोलन सुरू केले. खंबाळपाडा आगाराच्या प्रवेशद्वारावर कंत्रटी कामगारांनी ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे सकाळच्या वेळेतील स्वच्छतेचे नियोजन सपशेल कोलमडले होते. त्यावर महापालिकेच्या विविध प्रभागांमधील सफाई कामगारांसह अन्य कामगारांना आवाहन करत अधिका-यांनी तातडीने स्वच्छतेसाठी येण्याचे आवाहन केले. त्याला कर्मचा-यांनी प्रतिसाद दिला, आणि तातडीने कामाला सुरूवात झाली. स्वच्छता विभागाचे सहाय्यक अधिकारी विलास जोशी यांनी टिळक नगर पोलिस ठाण्याशी संपर्क साधत कुमक बोलावून घेतली. खंबाळपाडा आगारातील कचरा वाहक गाडय़ा सकाळी साडेआठ नंतर तातडीने शहरात नेण्यात आल्या. महापालिकेच्या वाहनचालकांनी आरसी गाडय़ा शहरात नेल्या. आणि सकाळी 9 नंतर शहरातील बहुतांशी भागांमधील कच-याच्या स्वच्छतेला सुरूवात झाली होती.आंदोलनकत्र्या कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर यांनी सांगितले की, महापालिकेने संबंधित ठेकेदाराच्या खात्यात 67 लाखांचा निधी जमा केल्याची माहिती मिळाली, परंतू तो निधी कामगारांच्या खात्यामध्ये जो र्पयत जमा होणार नाही तोर्पयत सफाई कामगार कामावर हजर राहणार नाहीत अशी भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे संध्याकाळर्पयत हा तिढा सुटू शकलेला नसला तरी महापालिकेने मात्र सणासुदीच्या काळात नागरिकांची गैरसोय केली जाणार नाही असे स्पष्ट केले.संबंधित आंदोलनकत्र्या सफाई कामगारांनी त्यांचा ठेकेदाराशी असलेला वाद मिटवावा, आणि लवकर कामावर हजर व्हावे असे आवाहन जोशी यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेdombivaliडोंबिवली