शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य खात्यातीलपांढऱ्या टोप्यां घातलेल्या  कंत्राटी अधिकारी - कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन छेडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 20:09 IST

विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय  हेल्थ मिशन (एनएचएम) अंतर्गत कार्यरत असलेले जिल्ह्याभरातील कंत्राटी, अधिकारी, कर्मचारी, अभियंते आदींनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन छेडले.

ठळक मुद्देशासनाच्या ‘एच आर परफॉर्मन्स एन्डीकेटर’ विरोधासहसेवेत कायम करा, तत्पुर्वी समान काम - समान वेतन द्याकंत्राटी, अधिकारी, कर्मचारी, अभियंते आदींनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू

ठाणे : शासनाच्या ‘एच आर परफॉर्मन्स एन्डीकेटर’ विरोधासह सेवेत कायम करा, तत्पुर्वी समान काम - समान वेतन द्या, ईपीएफ लागू करा आदी विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय  हेल्थ मिशन (एनएचएम) अंतर्गत कार्यरत असलेले जिल्ह्याभरातील कंत्राटी, अधिकारी, कर्मचारी, अभियंते आदींनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन छेडले.येथील मुंबई विभागीय आरोग्य उपसंचालकांच्या कार्यालयाबाहेर बेमुदत कामबंद आंदोलनास बसलेल्या या कर्मचारी सोमवारी येथील शासकीय विश्रामगृहासमोर धरणे आंदोलन छेडले. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांना मागण्यांचे निवेदन दिले. या आंदोलनात ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासह येथील सिव्हील रूग्णालय व ग्रामीण रूग्णालयामधील कंत्राटी अधिकारी- कर्मचा-यांचा मोठ्यासंख्येने सहभागी होते. दीर्घकाळपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी या कर्मचा-यांरी काम बंद आंदोलनास बुधवारपासून प्रारंभ केला. काळ्याफिती लावून हे कर्मचारी आरोग्य उपसंचालकांच्या कार्यालयासमोर मागील काही दिवसांपासून उपोषणास बसले आहेत. आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन छेडले.राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान- अधिकारी व कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष मनिष खैरनार यांच्यासह सचिव प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचा-यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. वेगवेगळ्या घोषणा असलेल्या पांढ-या टोप्या घालून या कर्मचा-यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. मुख्यमंत्र्यांसाठी असलेले निवेदन त्यांनी निवारी उपजिल्हाधिका-यांना दिले. त्याव्दारे शासनाने जारी केलेल्या एचआर परफॉर्मन्स एन्डीगेटरला विरोध केला आहे. या विरोधासह दहा ते बारा वर्षापासून कार्यरत असलेल्या या कर्मचा-यांचा अभ्यास समिती अहवाल शासनास देण्यात यावा, कर्मचा-यांना कामावरून काढू नये, शासन सेवेत कायम करा, कायम होईपर्यंत समान काम - समान वेतन द्यावे, आशा कार्यकर्ती आणि आशा गट प्रवर्तक यांना न्यूनतम मानधन देण्यात यावे, विमा संरक्षण लागू करा, बदली धोरण लागू करा, ईपीएफ सुरू करा आदी मागण्यांसाठी या कर्मचा-यांनी आंदोलन सुरू केले आहे. 

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद