शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा विभागातील कंत्राटी कामगार वेतनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 03:05 IST

ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या सुमारे ६० कामगारांना मागील ११ महिन्यांपासून वेतन अदा करण्यात आले नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या सुमारे ६० कामगारांना मागील ११ महिन्यांपासून वेतन अदा करण्यात आले नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यासंदर्भात श्रमिक जनता संघाच्या वतीने पालिकेला वारंवार निवेदने देऊनही पालिकेकडून अद्याप कोणत्याही स्वरूपाची हालचाल केली नसल्याने येत्या काळात हे कामगार रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा कामगारांनी दिला आहे.गेल्या ११ महिन्यांपासून ६० कामगारांना पगार नसल्याने या कामगारांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यातही या कामगारांना शासनाच्या धोरणानुसार किमान वेतन कायद्यानुसार पगार अदा करण्यात येत नाही. जो तुटपुंजा पगार दिला जातो, तोही महिनोन्महिने थकवला आहे. या कामगारांना जेमतेम पाच ते सहा हजार रुपये पगार मिळत आहे. त्यामुळे हे कामगार मेटाकुटीला आहेत. याचा फटका कळवा व कोपरी प्रभागांतील पाणीव्यवस्थापन विभागात काम करत असलेल्या कंत्राटी कामगारांना सर्वाधिक बसला आहे. यासंदर्भात श्रमिक जनता संघाचे सचिव जगदीश खैरालिया आणि उपाध्यक्ष संजीव साने यांनी यापूर्वी पालिकेकडे पत्रव्यवहार केला होता. परंतु, पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून अपेक्षित उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे त्यांनी आता कामगार आयुक्तांकडे दाद मागितली असून येत्या ७ सप्टेंबर रोजी बैठक बोलावली असल्याची माहिती खैरालिया यांनी दिली. रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ पालिका प्रशासनाने आणली असल्याचेही त्यांनी सांगितले. आयुक्त दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे.ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडून केवळ तीन महिन्यांचे वेतन दिले जाणे बाकी आहे. याचा अर्थ कंत्राटदाराने पालिकेकडून कामगारांच्या वेतनाची रक्कम घेऊन ती खिशात घातली व कामगारांच्या तोंडाला पाने पुसली का, असा सवाल आहे. ठाण्यासारख्या महागड्या शहरात ११ महिने तर सोडाच, पण तीन महिनेदेखील वेतनाविना दिवस काढणे खूप कठीण आहे.आमच्या विभागाकडून आतापर्यंत त्या कामगारांचे केवळ तीन महिन्यांचे वेतन अदा करणे शिल्लक आहे. त्यानुसार, वाढीव खर्चाचा ठराव मंजूर होणार असून लागलीच त्यांचे वेतन अदा केले जाईल. तसेच नवीन ठेकेदार नेमण्याची प्रक्रियासुद्धा अंतिम टप्प्यात असून ती पूर्ण झाल्यावर हा मुद्दा संपुष्टात येणार आहे.- रवींद्र खडताळे, पाणीपुरवठा अधिकारी, ठामपा

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका