शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघात! कंटेनरला ट्रकने दिली धडक; ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यात यश

By अजित मांडके | Updated: August 20, 2022 08:09 IST

Thane News : अपघातात ट्रकचालक/मालक दिनेश सोलकर (४०) हे अपघातग्रस्त ट्रकमध्येच अडकले होते. त्यांच्या नाकाला, चेहऱ्याला व पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

ठाणे - ठाण्याकडून भिवंडी, पडघा येथे जात असताना समोर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे उभ्या असलेल्या कंटेनरला ट्रकने जोरदार मागून धडक दिल्याची घटना शुक्रवारी रात्री ११ वाजून ४७ मिनिटांच्या सुमारास कॅडबरी कंपनीजवळ घडली. या अपघातात ट्रकचालक/मालक दिनेश सोलकर (४०) हे अपघातग्रस्त ट्रकमध्येच अडकले होते. त्यांच्या नाकाला, चेहऱ्याला व पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या एका बाजूला करून रस्ता मोकळा केल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षेने सांगितले.

ट्रक चालक सोलकर हे ठाण्यातील वागळे इस्टेट, सीपी तलाव येथे राहणारे आहेत. ते आपला रिकामा ट्रक घेऊन तीन हात नाका येथून मुंबई-नाशिक महामार्गे भिवंडी पडघा येथे जात होते. कॅडबरी जवळ आल्यावर त्यांनी आपल्या ट्रकने समोर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे उभ्या असलेल्या कंटेनर मागून जाऊन धडक दिली. तो कंटेनर वाशीहून भाईंदरला १५ टन बर्फाच्या लाद्या घेऊन जात होता. या अपघातात ट्रक चालक ट्रकमध्ये अकडल्याची माहिती मिळताच, घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्ष व अग्निशमन दल आणि नौपाडा पोलिस या विभागांनी धाव घेतली. तसेच अडकलेल्या सोलकर यांना आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढून उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. तसेच नौपाडा पोलिसांनी ट्रक क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला केला अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

 

टॅग्स :Accidentअपघातthaneठाणे