शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
4
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
5
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
6
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
7
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
8
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
9
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
10
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
11
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
12
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
13
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
14
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
15
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
16
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
17
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
18
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
19
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
20
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णसंख्या वाढत असतानाही कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 00:34 IST

परिस्थिती झाली बिकट : शिक्के मारण्यासही कर्मचारी मिळेनात

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच मृत्यूंचे प्रमाणही काही दिवसांत वाढले आहे. परंतु, असे असले तरी एखाद्या बाधित झालेल्या रुग्णाच्या संपर्कात असलेल्यांचे ट्रेसिंगही आता घटू लागले आहे. तसेच जे रुग्ण घरी उपचार घेत आहेत, अशांवर होम क्वारंटाइनचे शिक्के मारले जात होते. परंतु, आता तेदेखील होत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर, घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांना महापालिका केवळ आता फोनवरूनच संपर्क साधत आहे. 

ठाणे  महापालिका हद्दीत आतापर्यंत एक लाख सहा हजार ३२४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यातील ८९ हजार २०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, एक हजार ४९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, १५ हजार ६२९ रुग्णांवर सध्या प्रत्यक्ष स्वरूपात उपचार सुरू आहेत. यातील ११ हजार ४४५ रुग्ण घरीच विलगीकरणात असून सौम्य लक्षणे असलेल्या ६३० रुग्णांवर भाईंदरपाडा येथील विलगीकरण केंद्रात उपचार सुरू आहेत. तर, यातील तीन हजार १०७ रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळली आहेत. तर, ५९२ रुग्ण हे आयसीयूमध्ये असून १६८ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. परंतु, वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर घरी उपचार घेणा-या रुग्णांच्या दोन्ही हातांवर शिक्के मारले जावेत, असे आदेश ठाणे  जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. सुरुवातीला काही दिवस ही प्रथा सुरू होती. अशा रुग्णांच्या हातावर शिक्के मारतानाच त्याच्या घराबाहेर स्टिकरदेखील लावले जात होते. परंतु, मागील काही दिवसांपासून ही प्रथाच बंद केली आहे. या कामासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याची माहिती महापालिकेने दिली होती. मात्र, या कामासाठी लागणारी शाईच महापालिकेकडे उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे.

दुसरीकडे एखाद्या इमारतीत किंवा झोपडपट्टीत रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात असलेल्यांना विलगीकरण केंद्रात पाठविले जात होते. परंतु, आता ही प्रथादेखील महापालिकेकडून बंद झाली असून सुरुवातीला एकास ४५ असे प्रमाण होते. ते आता ३५ च्या घरात आले आहे. परंतु, ते कागदावरच दिसत आहे. प्रत्यक्षात रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांची शोधमोहीमच बंद असल्याची माहिती समोर आली आहे. 

घरी असलेले रुग्ण रामभरोसे पॉझिटिव्ह रुग्णात लक्षणे नसतील, तर त्याला घरीच उपचार घेण्यासाठी सांगितले जाते. त्याच्याशी फोनवरून एकदाच संपर्क साधला जात असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी अशा रुग्णांसाठी औषधे दिली जात होती. त्याच्या संपर्कातील मंडळींनादेखील खबरदारी म्हणून औषधे दिली जात होती. शिवाय, ऑक्सिमीटरच्या माध्यमातून त्या रुग्णांची तपासणी केली जात होती. आता एकदाच संपर्क साधला जात असून त्यानंतर त्या रुग्णाचे काय झाले, याची माहितीही घेतली जात नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस