शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

पेट्रोल दरवाढीने सीमा भागातील ग्राहक वळले गुजरातकडे, करोना संक्रमणाची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 4:20 PM

महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी पार गेल्याने वाहनचालकांच्या खिशाला कात्री लागली आहे. डहाणू आणि तलासरी हे तालुके गुजरात राज्याच्या सीमेवर वसले आहेत. गुजरातला पेट्रोलचे दर हे पालघर जिल्ह्यातील दरापेक्षा नऊ रुपायांनी कमी आहेत.

बोर्डी - राज्यातील अनेक भागांत तसेच पालघर जिल्ह्यात पेट्रोलचे दर शंभरीपार गेले आहेत. दरम्यान, लगतच्या गुजरात राज्यात हेच दर नऊ रुपयांनी कमी असल्याने सीमाभागातील ग्राहकांनी गुजरातची वाट धरली आहे. यामुळे करोना संक्रमणाचा धोका वाढण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. (Consumers in border areas turn to Gujarat due to petrol price hike, fear of corona transition)

महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी पार गेल्याने वाहनचालकांच्या खिशाला कात्री लागली आहे. डहाणू आणि तलासरी हे तालुके गुजरात राज्याच्या सीमेवर वसले आहेत. गुजरातला पेट्रोलचे दर हे पालघर जिल्ह्यातील दरापेक्षा नऊ रुपायांनी कमी आहेत. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील वाहनचालक लगतच्या राज्याच्या उंबरगाव शहरातील पेट्रोल पंपांवर जातात. या दोन्हीकडील दरात नेहमीच हा फरक असतो. किंबहुना त्याचाच फायदा घेत उंबरगाव येथील पेट्रोल पंपचालकांनी महाराष्ट्राच्या झाई गावच्या दीड-दोन किमी अंतरावर पंप सुरू केले आहेत. आगामी काळात पंपांची संख्या वाढण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत.

सीमाभागातील वाहनचालकांना केवळ गुजरात राज्याचा एकमेव पर्याय नाही. तर दमण आणि सिल्व्हासा या केंद्रशासित प्रदेशातही पेट्रोलचे भाव कमी आहेत. दरम्यान, राज्यातील दर शंभरीपार गेल्यानंतर तेथील पंपाचालक डहाणू, तलासरीतील ग्राहकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील पंपचालकांवर आर्थिक कुऱ्हाड कोसळली आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी अन्य राज्यातून महाराष्ट्रात प्रवेशासाठी आरटीपीसीआर चाचणीचा मागील ४८ तासांचा निगेटिव्ह अहवाल सोबत असणे आवश्यक आहे. मात्र काही रुपयांसाठी येथील वाहनचालक कायद्याला बगल देत, आर्थिक फायदा पाहात आहेत. त्यामुळे कोविड संक्रमणाची शक्यता असल्याने प्रशासनाने नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असे मत नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

 

 

टॅग्स :Petrolपेट्रोलGujaratगुजरातcorona virusकोरोना वायरस बातम्या