शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

गुगलवर विविध कंपन्यांच्या नावाने कर्ज देण्याच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक

By जितेंद्र कालेकर | Updated: December 23, 2019 22:07 IST

कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली एका ७० वर्षीय महिलेला एका भामट्याने मोबाइलवर एक लिंक पाठविली होती. ती पाहिल्यानंतर तिच्या बँक खात्यातून ६१ हजारांची रोकड गायब झाल्याची घटना नुकतीच घडली. त्यामुळे कोणी कर्ज मिळवून देतो, अशी बतावणी केली तर सावधानता बाळगा, असे आवाहन ठाणे शहर पोलिसांनी केले आहे.

ठळक मुद्देबनावट कस्टमर केअर क्रमांक अपलोड करून घातला जातो गंडा सावधानता बाळगण्याचे पोलिसांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोणी कर्ज मिळवून देतो, अशी बतावणी केली तर सावधानता बाळगा, असे आवाहन ठाणे शहर पोलिसांनी केले आहे. कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली एका ७० वर्षीय महिलेला एका भामट्याने मोबाइलवर एक लिंक पाठविली होती. ती पाहिल्यानंतर तिच्या बँक खात्यातून ६१ हजारांची रोकड गायब झाल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल झाली आहे.ठाण्यातील श्रीरंग सोसायटीत राहणाऱ्या अनिता पाठारे (नावात बदल) या शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या महिलेला कौटुंबिक कामासाठी कर्जाची आवश्यकता होती. त्यासाठी तिने आणि तिच्या पतीने इंटरनेटच्या माध्यमातून कर्ज देणाºया कंपनीचा क्रमांक शोधला. तेव्हा गुगलद्वारे त्यांना राहुल शर्मा याचा मोबाइल क्रमांक मिळाला. या क्रमांकावर पाठारे यांनी फोन केला. तेव्हा आपण बजाज कंपनीकडून कर्ज मिळवून देतो, अशी त्याने बतावणी केली. त्यानंतर, त्याने पाठारे यांच्या मोबाइलवर एक लिंक पाठविली. ती शर्मा यांनी उघडून पाहिल्यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून यूपीआय आणि पेटीएमद्वारे ६१ हजार ५६० रुपयांची रोकड त्याने लंपास केली. या प्रकारानंतर पाठारे यांनी शर्माला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा मोबाइल बंद असल्याचे आढळले. ज्या बँकेतून त्यांचे पैसे काढण्यात आले, ती बँक ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आहे. त्यामुळे याप्रकरणी ६ डिसेंबर रोजी त्यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याच तक्रारीचा तपास २३ डिसेंबरपासून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या सायबर सेल विभागामार्फत करण्यात येत आहे.-------गुगलवरील कोणत्याही क्रमांकापासून सावधानसध्या गुगलवर बनावट कस्टमर केअर क्रमांकांचा सुळसुळाट झाला आहे. आॅनलाइन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून सायबर गुन्हे करणारे भामटे हे आपल्या जाळ्यात सावज ओढण्यासाठी असे बनावट कस्टमर केअर क्रमांक गुगलवर अपलोड करतात. त्यांनी अपलोड केलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर फोन करणाºया व्यक्तीच्या मोबाइलवर हे भामटे अशीच एखादी लिंक पाठवितात. ती पाहणाºयाच्या बँक खात्यातून हे भामटे आॅनलाइनद्वारे सफाईदारपणे पैसे लंपास करतात. अशा भामट्यांनी कर्ज देणाºया वित्तीय संस्थांपासून ते गृहोपयोगी वस्तू घरपोच देणाºया आॅनलाइन शॉपिंग कंपन्यांच्या नावाने बोगस कस्टमर केअर क्रमांक गुगलवर अपलोड केले आहेत. त्यामुळे गुगलवरून सर्च केलेल्या कस्टमर क्र मांकावर फोन करताना सावधानता बाळगावी, असे आवाहन ठाणे शहर पोलिसांच्या सायबर सेल विभागाने केले आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी