शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कुलमुखत्यारपत्र बनवून हडपलेल्या जमिनीवर गोदामाचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 21:19 IST

मृत पावलेल्या आणि अशिक्षित असलेल्या व्यक्तींच्या कुलमुखत्यारत्रापत्रावर स्वाक्षऱ्या करुन बनावट कागदपत्रे तयार करुन त्याद्वारे हाडपलेल्या जमिनीवर गोदामाचे बांधकाम करणाºया प्रकाश नानजी पटेल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत १५६ (३) प्रमाणे ठाणे न्यायालयाने सखोल चौकशीचे आदेश वर्तकनगर पोलिसांना शनिवारी दिले.

ठळक मुद्देमृत आणि अशिक्षितांच्याही कुलमुखत्यारपत्रावर स्वाक्षरीमाहिती अधिकारातून झाले उघड

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : बनावट कुलमुखत्यारपत्र बनवून त्याआधारे जमीन हडप करून गोदामाचे बांधकाम केल्याप्रकरणी प्रकाश नानजी पटेल (३५, रा. घोडबंदर रोड, ठाणे) याच्याविरुद्ध बबन कान्हा पाटील यांनी अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत १५६ (३) प्रमाणे ठाणे न्यायालयाने सखोल चौकशीचे आदेश वर्तकनगर पोलिसांना शनिवारी दिले.बबन पाटील यांची भिवंडीतील पिंपळास येथे ११ गुंठे शेतजमीन आहे. २०१५ मध्ये प्रकाश पटेल यांनी त्यांना काहीही न सांगता त्यांच्या जमिनीवर भराव टाकून त्यावर भूमी वर्ल्ड नावाने गोदाम पार्कची उभारणी केली. बबन पाटील यांनी अटकाव करूनही ती जागा आपली असल्याचा दावा करीत त्यांना धमकी दिली. अखेर, त्यांनी याप्रकरणी पिंपळास ग्रामपंचायत, भिवंडी तहसीलदार कार्यालय आणि ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रकाश पटेल यांच्याविरुद्ध तक्रार केली. कालांतराने १५ आॅक्टोबर २०१९ रोजी बबन यांना माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मिळाली की, प्रकाश पटेल यांनी बबन पाटील यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावे २७ मे २००८ रोजी कुलमुखत्यारपत्र तयार केले आहे. त्यात त्यांचा मोठा चुलता सीताराम पाटील, वडील कान्हा पाटील तसेच लहान चुलते चिंतामण पाटील यांच्या अनुक्रमे स्वाक्ष-या आणि ठसेही या कुलमुखत्यारपत्रामध्ये होते. विशेष म्हणजे त्यांचे चुलते सीताराम पाटील यांचा १८ डिसेंबर १९८९ रोजी मृत्यू झाला असूनही २००८ मध्ये तयार करण्यात आलेल्या कुलमुखत्यारपत्रामध्ये त्यांची स्वाक्षरी दिसून आली. त्यांचे वडील कान्हा पाटील हे अशिक्षित असूनही त्यांची स्वाक्षरीही त्या कागदपत्रांवर होती. चिंतामण पाटील यांचा बनावट अंगठा त्यावर होता. अशा प्रकारे प्रकाश पटेल यांनी बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करून ते एमएमआरडीएच्या ठाणे कार्यालयामध्ये सादर केले. त्या जागेवर बांधकामाची परवानगी घेऊन गोदामाचे बांधकाम पटेल याने केले. हे लक्षात आल्यानंतर पटेल यांच्याविरुद्ध त्यांनी न्यायालयामार्फत वर्तकनगर पोलीस ठाण्यात ८ फेब्रुवारी २०२० रोजी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे