भिवंडीत १७ नव्या महसुली गावांची निर्मिती, १० तलाठी सजा कार्यालयांची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 04:02 PM2021-07-09T16:02:48+5:302021-07-09T16:02:56+5:30

राजनगर, साईगाव, ठाकुरगाव, शिवनगर, कैलासनगर, ब्राह्मणगाव, खार्डी, मालोडी, शिवाजीनगर, चिराडपाडा, आतकोली, सोनटक्का, मोहिली बु, हिवाळी, रवदी, पायगाव, घोलगाव या नव्या महसुली गावांची निर्मिती जुन्या महसुली गावांची विभागणी करून करण्यात आली आहे

Construction of 17 new revenue villages in Bhiwandi, establishment of 10 Talathi Punishment Offices | भिवंडीत १७ नव्या महसुली गावांची निर्मिती, १० तलाठी सजा कार्यालयांची स्थापना

भिवंडीत १७ नव्या महसुली गावांची निर्मिती, १० तलाठी सजा कार्यालयांची स्थापना

googlenewsNext
ठळक मुद्देराजनगर, साईगाव, ठाकुरगाव, शिवनगर, कैलासनगर, ब्राह्मणगाव, खार्डी, मालोडी, शिवाजीनगर, चिराडपाडा, आतकोली, सोनटक्का, मोहिली बु, हिवाळी, रवदी, पायगाव, घोलगाव या नव्या महसुली गावांची निर्मिती जुन्या महसुली गावांची विभागणी करून करण्यात आली आहे

भिवंडी - भिवंडी तालुक्याचा महसुली विस्तार मोठा असतानाच या भागात फोफावलेल्या गोदाम व्यवसायामुळे येथील जमिनीचे महत्व वाढले आहे. त्यातच १९७८ पासून ठप्प असलेल्या नव्या महसुली गाव निर्मितीस तहसीलदार अधिक पाटील यांनी चालना देत तब्बल १७ नव्या महसुली गावांची निर्मिती केली असून त्या गावचे जमीन अभिलेख स्वतंत्र करून ते संगणकीय प्रणाली मध्ये समाविष्ट करण्याचे काम सुरू असून आता पर्यंत सहा गावांचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती तहसीलदार अधिक पाटील यांनी गुरुवारी दिली आहे. 
            
राजनगर, साईगाव, ठाकुरगाव, शिवनगर, कैलासनगर, ब्राह्मणगाव, खार्डी, मालोडी, शिवाजीनगर, चिराडपाडा, आतकोली, सोनटक्का, मोहिली बु, हिवाळी, रवदी, पायगाव, घोलगाव या नव्या महसुली गावांची निर्मिती जुन्या महसुली गावांची विभागणी करून करण्यात आली आहे. त्याच बरोबर तालुक्यात कार्यरत सहा मंडळ अधिकारी व ३८ तलाठी सजा कार्यालयांमध्ये सुध्दा वाढ करण्यात आली असून शेलार व अंबाडी या दोन नव्या मंडळ कार्यालयांची निर्मिती करून एकूण आठ मंडळ कार्यालयांतर्गत दहा नव्या तलाठी सजा कार्यालयांची भर पडल्याने एकूण ४८ तलाठी सजा निर्माण करण्यात आले आहेत.

स्थानिक जमीनधारकाना तत्काळ जमीन अभिलेख उपलब्ध व्हावा व गतिमान प्रशासन राबविता यावे या साठी १९७८ नंतर भिवंडी तालुक्यात महसूल विभागात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार अधिक पाटील यांनी दिली आहे.

Web Title: Construction of 17 new revenue villages in Bhiwandi, establishment of 10 Talathi Punishment Offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.