शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

काँग्रेसची तिघांना कारणे दाखवा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:24 IST

काँग्रेसच्या राज्यव्यापी जनसंघर्षयात्रेच्या निमित्ताने शहरात गुरुवारी झालेल्या जाहीर सभेत बॅनरबाजीवरून स्थानिक पातळीवरील प्रकाश मुथा आणि संजय दत्त गटातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकमेकांना भिडले होते.

कल्याण : काँग्रेसच्या राज्यव्यापी जनसंघर्षयात्रेच्या निमित्ताने शहरात गुरुवारी झालेल्या जाहीर सभेत बॅनरबाजीवरून स्थानिक पातळीवरील प्रकाश मुथा आणि संजय दत्त गटातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकमेकांना भिडले होते. याप्रकरणी पक्षाच्या प्रदेश कार्यालयाने पक्षाचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी आणि प्रदेश सचिव प्रकाश मुथा अशा तिघांना नोटीस बजावल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारविरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यव्यापी जनसंघर्षयात्रा काढली. त्यानिमित्ताने पश्चिमेकडील यशवंतराव चव्हाण क्रीडांगण (मॅक्सी ग्राउंड) येथे जाहीर सभा घेतली. या सभेला प्रमुख वक्ते म्हणून प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित होते. परंतु, प्रमुख नेत्यांचे आगमन होण्याच्या अगोदर सभेच्या व्यासपीठावर लावलेल्या बॅनरवर युवक काँगे्रसच्या नेत्यांचे फोटो नसल्याने वाद निर्माण झाला.संजय दत्त यांच्या गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हरकत घेतल्यानंतर बॅनर बदलण्यात आला. परंतु, बदललेल्या बॅनरवर स्थानिक नेते प्रकाश मुथा यांचा फोटो आकाराने लहान असल्याने त्यांचे समर्थक संतप्त झाले. यात मुथा आणि दत्त गट चक्क हातघाईवर येत एकमेकांना भिडले. हा सर्व तमाशा पत्रकार आणि सभेला आलेल्या नागरिकांसमोर घडला. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना बाजूला केल्याने सभेच्या ठिकाणी निर्माण झालेला तणाव निवळला. हा प्रकार घडला तेव्हा पोटे घटनास्थळी नव्हते.दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल प्रदेश नेत्यांनी घेतली आहे. मुथा, पोटे आणि कुलकर्णी यांना नोटीस बजावून खुलासा मागितला आहे. कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता नोटीस मिळाल्याचे मान्य केले, तर मुथा यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही....तर सामोरे जाईनसभेतील त्या घटनेप्रकरणी मला नोटीस बजावण्यात आली आहे. परंतु, आम्ही सभेला गालबोट लागेल किंवा पक्षाची प्रतिमा मलीन होईल, असे कृत्य केलेले नाही. जर याचे पुरावे असतील, तर आम्ही प्रदेशाध्यक्षांच्या कारवाईला सामोरे जायला तयार आहोत, असे मत पोटे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :congressकाँग्रेसkalyanकल्याण