शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

काँग्रेसची यादी घोषित

By admin | Updated: October 12, 2015 05:20 IST

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी व जागावाटप सर्वात आधी करून आघाडी घेतली आहे. शनिवारी रात्री केलेल्या घोषणेनुसार काँग्रेसने आपली पहिली यादी घोषित केली असून, त्यात खालील उमेदवारांचा समावेश आहे.

डोंबिवली : काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी व जागावाटप सर्वात आधी करून आघाडी घेतली आहे. शनिवारी रात्री केलेल्या घोषणेनुसार काँग्रेसने आपली पहिली यादी घोषित केली असून, त्यात खालील उमेदवारांचा समावेश आहे. रीना खांडेकर (कोलीवली) , एकनाथ वायळ (आंबिवली गावठाण), चंद्राबाई जाधव (मांडा पश्चिम), कृष्णकांत दळवी (टिटवाळा गणेश मंदिर), लता जाधव (गाळेगाव), दिपाली सालवे (बीर्ला कॉलेज), विद्या चव्हाण (खडकपाडा), कांचन कुलकर्णी (आधारवाडी), उज्वला पंडित (बेतुरकर पाडा), गीता परदेसी (रामदास वाडी), दीपेश भागवत (होलीक्रॉस शाळा), अरुण गीध (अहिल्याबाई चौक), सत्यजित झुंजारराव (सिद्धेश्वर आळी), आदिती बाबडे (रोहिदास वाडा), इस्लाम पठान (बैलबाजार) वनिता सानप (रामबाग), सचिन पोटे (लोकग्राम), जान्हवी पोटे (कोळसेवाडी), रवींद्र भावे (मेट्रोमॉल), भारती चौधरी (कचोरे), संजीवनी चौधरी (चोळेगाव) प्रकाश म्हात्रे (गरिबाचा वाडा), अमित पवार (जाईबाई विद्यामंदिर), शकीला बाबू शेख (आनंदवाडी), विशाखा कासले (आमराई), प्रियंका सिंग (हनुमान नगर), ज्योती खांडेकर (दुर्गामाता मंदिर), शैलेश तिवारी (लक्ष्मीबाग), विश्वास सावंत (महाराष्ट्र नगर), धनेश भोईर (मोठागाव-ठाकुर्ली), जितेंद्र भोईर (गावदेवी मंदिर-नवागाव), हर्षदा हृदयनाथ भोईर (जयहिंद कॉलनी), नंदू म्हात्रे (प्रसाद सोसायटी), सुचित्रा भोईर (कान्होजी जेधे मैदान), रत्नप्रभा म्हात्रे (गणेश मंदिर), नवीन सिंग (विष्णूनगर), गीता चौधरी (कोपर रोड), विद्या सावंत (जुनी डोंबिवली), शारदा पाटील (कोपरगाव), राहुल केणे (आयरेगाव), प्रणव केणे (दत्तनगर) शंकरलाल पटेल (रामनगर), जितेंद्र मुळे (शिवमार्केट), दर्शना शेलार (इंदिरा नगर), अजय शेलार (पाथर्ली गावठाण), वाल्मिक पाटील (संगीता वाडी), दीप्ती दोशी (एकतानगर), वर्षा शिखरे (आनंदनगर-गांधीनगर), शीला भोसले (गोग्रासवाडी), भूपेश सिंह (जरीमरी नगर), देवेश मिश्रा (साई नगर), रमिला दिलीप ठक्कर (खडेगोळवली) आदी.चिकणघर : कल्याण-डोंबिवली मनपाच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागली असल्याने तिच्या चौकटीतच प्रचार झाला पाहिजे, अन्यथा निवडणूक आयोग कारवाई करणार असल्याची जाहीर तंबी दिली आहे. याचा सर्वच पक्ष आणि अपक्ष इच्छुक उमेदवारांनी धसका घेतला आहे. यामुळे सर्वांनीच सोशल मीडियाचा स्वस्त आणि मस्त पर्याय निवडला आहे. फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्सअ‍ॅपसारखे सोशल मीडियाचे पर्याय अद्याप तरी आचारसंहितेच्या कचाट्यात येत नसल्याने सोशल मीडिया हे प्रचारासाठी प्रभावी माध्यम ठरत आहे. याचा लाभ उठवित कल्याण-डोंबिवली सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून, सेना-भाजपाकडून एकमेकांवर वैयक्तिक टीकाही सुरू झाली आहे. आचारसंहितेमुळे आयोगाने ठरवून दिलेल्या खर्च आणि बॅनरवरील निर्बंधामुळे उमेदवारांना भपकेबाज प्रचाराला अडसर ठरत आहे. सोशल मीडियावर अल्प खर्चात घराघरांत प्रचार केला जातो. शिवाय, एकमेकांचे आरोप-प्रत्यारोप त्वरित कळत असल्याने वेगाने जबाब दिला जातो. एक्सपर्टची मागणी : सोशल मीडियामधील व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टिष्ट्वटरवर प्रचार करणाऱ्या एजन्सी उमेदवारांकडून ५० हजार ते १ लाखापर्यंतचे पॅकेज घेत आहेत. यामध्ये पक्षांचा जाहीरनामा, उमेदवारांची माहिती, नेत्यांच्या आणि उमेदवारांच्या आवाहनांचा समावेश आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये ११२ प्रभाग असून प्रत्येक उमेदवाराने सोशल मीडियावरील प्रचाराचे पॅकेज दिलेले आहे. मात्र, या खर्चाचा समावेश उमेदवारांनी निवडणूक खर्चात करावा की नाही, याबाबत स्पष्टता नाही. कल्याणमध्ये साधारणपणे चार-पाच एजन्सी अशा प्रचारात गुंतलेल्या आहेत. कल्याण पूर्वचे अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी भाजापाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांच्यावर त्या भागातून पक्षाचे नगरसेवक निवडून आणण्याची मोठी जबाबदारी आहे. त्यांनी विधानसभेत जेव्हा अपक्ष निवडणूक लढवली होती, तेव्हा त्यांची टिव्ही निशाणी होती. तीच निशाणी घेऊन आता महापालिकेच्या निवडणुकीत काहीजण उभे राहणार आहेत. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे आमदार नेमके कोणाचे समर्थन करत आहेत? असा सवाल निर्माण झाल्याने गोंधळाचे वातावरण आहे. आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा? असा सवाल काही कार्यकर्त्यांना पडला आहे.