शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
2
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
3
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
4
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
5
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
6
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
7
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
8
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
9
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
10
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
11
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
12
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
13
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
14
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
15
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
16
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
17
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
18
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
19
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
20
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेसेनेच्या शायना एनसी सह भाजपाच्या १३ जणांवर काँग्रेस नेते मुझफ्फर हुसैन यांनी ठोकला १०० कोटींचा मानहानीचा दावा

By धीरज परब | Updated: August 14, 2025 00:11 IST

विधानसभा निवडणुकीत मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे नरेंद्र मेहता व काँग्रेसचे मुझफ्फर हुसैन यांच्यात लढत होती. 

मिरारोड - गेल्या वर्षी विधानसभा  निवडणुकीत मीरा भाईंदर मतदार संघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार मुझफ्फर हुसैन यांचे बॉम्ब स्फोटातील आरोपीं सोबत संबंध असल्याचा खोटा प्रचार समाज माध्यमांवर करून बदनामी केल्या प्रकरणी तत्कालीन भाजपा नेत्या व सध्या शिंदेसेनेत असलेल्या शायना एनसी सह भाजपाच्या एकूण १३ जणां विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटींचा मानहानीचा दावा मुझफ्फर हुसैन यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकीत मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे नरेंद्र मेहता व काँग्रेसचे मुझफ्फर हुसैन यांच्यात लढत होती. निवडणूक प्रचार दरम्यान बॉम्ब स्फोट खटल्यातील आरोपी याकूब मेमन याची फाशी माफ करण्या संदर्भात मर्सी पिटीशन वरती मुझफ्फर हुसैन यांची सही असल्याचे बनावट पिटीशन पत्र बनवून आतंकवादीचे स्टिकर लावून त्या शेजारी हुसैन यांचा फोटो लावून समाज माध्यमांवर पोस्ट व शेअर केले होते. 

काँग्रेस नेते व उमेदवार हुसैन हे निवडणुकीत निवडून येऊ नये म्हणून त्यांचे आतंकवाद्यांशी संबंध व ते त्यांना वाचवण्यासाठी सहकार्य असल्याचे भासवण्यात आले. हुसैन यांच्या विरुद्ध लोकांमध्ये भ्रम, द्वेष व धार्मिक  तेढ निर्माण करून त्यांची प्रतिमा मलीन केली गेली.

त्यावेळी सदरचे खोटे मेसेज समाज माध्यमांवर प्रसारित केल्या प्रकरणी भाजपाचे जेरोम डिसूजा, कुणाल शुक्ला, गणेश मुरुगन सह आमची मुंबई इन्स्टा पेज, दि फिटिंग फाईटस पेज विरुद्ध मीरारोड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, लोकप्रतिनिधीत्व अधिनियम नुसार  ऍड. राहुल राय  यांच्या मार्फत गुन्हा नोंदवण्यात आला होता. तर अन्य आरोपींचा पण गुन्ह्यात समाविष्ट करण्यासाठी तक्रार देण्यात आली होती. 

तसेच निवडणूक जिंकण्यासाठी हुसैन यांचे खोटे बदनामीकारक संदेश व पोस्ट  व्हायरल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र त्या नंतर देखील भाजपच्या अनेकांनी हुसैन पराभूत व्हावेत म्हणून जाणीवपूर्वक बदनामी कारक संदेश व्हायरल केले होते.  

मुझफ्फर हुसैन पराभूत व्हावेत आणि भाजपा उमेदवार निवडणून यावेत म्हणून त्यांची प्रतिमा विधानसभा निवडणुकीत मलीन केल्याबद्दल तत्कालीन भाजप  नेत्या व विद्यमान शिंदेसेना प्रवक्त्या शायना एन. सी., भाजपाचे माजी नगरसेवक दिनेश तेजराज जैन, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते जोरावरसिंह गोहील, प्रियेश शाह, नितीन बी. पांडे, महेश चव्हाण, शैलेश लालजी पांडे, कुणाल शुक्ला, जेरोम डिसोजा, गणेश के मुरुगन, ऍड. अविनाश रघुनाथ सूर्यवंशी सह बीफायटिंग फॅक्टस्,  आमची मुंबई इन्स्टा पेज व इतर यांच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकला असल्याचे ऍड. राहुल राय यांनी सांगितले.  यावेळी काँग्रेस नेते मुझफ्फर हुसैन, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचीन सावंत, जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत आदी उपस्थित होते.

निवडणूक जिंकण्यासाठी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन भाजपाने कटकारस्थाने करून दहशतवाद्यांचा वापर देखील केला. भ्रष्टाचार सह अनेक गंभीर गुन्हे व घोटाळे केलेल्या भाजपा उमेदवाराला निवडून आणण्यासाठी काँग्रेस व काँग्रेस उमेदवार मुझफ्फर हुसैन यांची खोटा प्रचार करून जनमानसात बदनामी केल्याचा आरोप यावेळी प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी केला.