शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातीस लसीकरणाच्या राजकारणात कॉंग्रेसची उडी, लस ही सर्वसामान्यांची, कॉंग्रेसची घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 12:56 IST

Corona Vaccine Politics in Thane: ठाण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सुरु असलेल्या लसीकरणाच्या राजकारणात आता कॉंग्रेसने देखील उडी घेतली आहे.

ठाणे  - ठाण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सुरु असलेल्या लसीकरणाच्या राजकारणात आता कॉंग्रेसने देखील उडी घेतली आहे. लसीकरणाचे राजकारण थांबवा या मागणीसाठी आणि सर्वसामान्यांना लस उपलब्ध करुन देण्यासाठी बुधवारी शहर कॉंग्रेसच्या वतीने महापालिका मुख्यालयाबाहेर धरणो आंदोलन करण्यात आले.

मागील काही दिवसापासून शहरात लसीकरणाचे राजकारण चांगलेच तापले आहे. कळव्यात शिवसेनेने लसीकरण मोहीम घेऊन राष्ट्रवादीला चपराक देण्याचा प्रयत्न केला असतांना दुसरीकडे राष्ट्रवादीने देखील कोपरी पाचपाखाडी मतदार संघात लसीकरण घेण्यासाठी महापौरांकडे परवानगी मागितली आहे. त्यानंतर आता कॉंग्रेसने देखील उडी घेतली असून त्यानुसार हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शहर कॉंग्रेसचे पदाधिकारी यात सहभागी झाले होते. व्हॅक्सीन ही सर्वसामान्य जनतेची असल्याने ती त्यांनी उपलब्ध झालीच पाहिजे, लसीकरणाचे राजकारण बाजूला ठेवा, लस नाही कोणाच्या बापाची ती ठाणेकरांच्या हक्काची अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. कोरोना आटोक्यात येत असतांना लसीकरण मोहीम विशिष्ट हेतून राबविली जात असल्याचा निषेधही यावेळी करण्यात आला. त्यातही महापौरांच्या दालनात जाऊन आंदोलन करणे  चुकीचे असल्याचे सांगत यावेळी कॉंग्रेसने राष्ट्रवादीवर टिका देखील केल्याचे दिसून आले. लस ही जनतेच्या पैशातून येत असल्याने त्यातून स्वत:चे जाहीरातबाजी केली जात आहे, स्वत:चे बॅनर लावले जात आहेत, हे अतिशय चुकीचे असल्याचे मतही यावेळी कॉंग्रेसच्या पदाधिका:यांनी व्यक्त केले. त्यातही हे यावेळी या आंदोलनात कॉंग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण, सचिन शिंदे आदींसह इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेसCorona vaccineकोरोनाची लसthaneठाणे