शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसकडून आंबेडकरांचा अवमान, केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 03:08 IST

संसद चालू न देणे, अर्थसंकल्पासारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करू न देणे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या संविधानाचा अवमान असल्याचे मत व्यक्त करून केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी डॉ. आंबेडकरांना निवडणुकीत पाडण्यासाठी काँग्रेसनेच उमेदवार दिला होता, असे खडेबोल गुरुवारी सुनावले.

ठाणे : संसद चालू न देणे, अर्थसंकल्पासारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करू न देणे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या संविधानाचा अवमान असल्याचे मत व्यक्त करून केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी डॉ. आंबेडकरांना निवडणुकीत पाडण्यासाठी काँग्रेसनेच उमेदवार दिला होता, असे खडेबोल गुरुवारी सुनावले.भाजपा खासदारांच्या देशव्यापी उपोषणात सहभागी होण्यासाठी ते गुरुवारी ठाण्यात आले होते. यावेळी त्यांच्या समवेत आमदार संजय केळकर, शहर अध्यक्ष संदीप लेले, माधवी नाईक, गटनेते मिलिंद पाटणकर, मनोहर डुंबरे आदींसह इतर नगरसेवक तथा पदाधिकारी उपस्थित होते.काँग्रेसविरोधात आम्ही संसद अधिवेशन काळातच उपोषण करण्याचे ठरविले होते. परंतु, ही माहिती फुटल्याने काँग्रेसने घाईघाईत फसवे उपोषण केल्याचा आरोपही गोयल यांनी केला. जनहिताच्या गोष्टी करण्यापेक्षा दिखावू राजकारण त्यांच्याकडून केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपा सरकार हे दलितांचे बाजूने असून त्यांच्या विचारसरणीने आम्ही चालत आहोत. परंतु, काँगे्रसला हे खपत नसल्याने त्यांच्याकडून अशा प्रकारच्या कुरापती सुरू आहेत. शिर्डी संस्थांमधील भ्रष्टाचारा संदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या ट्टिव्ट बाबत गोयल यांना छेडले असता, त्यांनी सांगितले की, याबाबतचा खुलासा आम्ही पूर्वीच केला आहे. परंतु, काँग्रेसने टॅक्सबाबत किंबहुना त्यांनी कधी टॅक्स भरलेलाच नसल्याने, त्यांनी याबबात आरोप करणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले.>सेल्फिस्टिक ठरले आकर्षण : भाजपाचे उपोषण सकाळी १० वाजता सुरू असणे अपेक्षित असताना सव्वा तास उशिराने ते सुरू झाले. त्यातही पक्षाच्या नगरसेविका गोयल उपोषण स्थळी आल्यानंतर एक तास उशिराने हजर झाल्या. त्यातही त्यातील काहींनी केवळ मोबाइलवर सेल्फी काढून आम्ही आंदोलनात सहभागी होतो, हे दाखविण्याचाच प्रयत्न केला. अगदी नट्टापट्टा व मेकअप करून त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला खरा. परंतु, अवघ्या १५ मिनिटातच मीडियांकडून फोटो शूट आणि गोयल यांचे निवेदन सादर झाल्यानंतर त्यांनी उपोषणाच्या ठिकाणाहून काढता पाय घेतला.

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयल