शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
3
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
4
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
5
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
6
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
7
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
8
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
9
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
10
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
11
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
12
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
13
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
14
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
15
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
16
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
17
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
18
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
19
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
20
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान

उशीची किंमत ९०० रुपये, काँग्रेस आक्रमक; उल्हासनगर महापालिकेचे रुग्णालयाचे साहित्य वादात?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 8:37 PM

Ulhasnagar News:  उल्हासनगरात कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी ४०० खाटाचे रुग्णलाय उभारणार आहे. त्यापैकी २०० खाटाचे स्वतःचे रुग्णालय महापालिका रिजेन्सी अंटेलिया येथे उभारणार असून दोन रुग्णालय, लॅब व ऑक्सिजन प्लॅन्ट साठी तब्बल ११ कोटीचे साहित्य खरेदी करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समिती सभेत कोरोना आपत्कालीन स्थिती बघून मंजुरी देण्यात आली

- सदानंद नाईक उल्हासनगर : महापालिका स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी यांनी महापालिका रुग्णालयाला पुरविण्यात येणाऱ्या साहित्य व वस्तूच्या किमती बाबत आक्षेप घेऊन, वस्तूच्या दराला महापालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांना जबाबदार धरून ११ कोटीच्या प्रस्तावाला समिती सभेत मंजुरी दिली. अशी माहिती सभापती सिरवानी यांनी दिली असून अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता झाला नाही. (Congress aggressive; Ulhasnagar Municipal Corporation hospital materials in dispute?)

 उल्हासनगरात कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी ४०० खाटाचे रुग्णालय उभारणार आहे. त्यापैकी २०० खाटाचे स्वतःचे रुग्णालय महापालिका रिजेन्सी अंटेलिया येथे उभारणार असून दोन रुग्णालय, लॅब व ऑक्सिजन प्लॅन्ट साठी तब्बल ११ कोटीचे साहित्य खरेदी करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समिती सभेत कोरोना आपत्कालीन स्थिती बघून मंजुरी देण्यात आली. असे मत स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी यांनीं दिली. तसेच वस्तूच्या दराची जबाबदारी आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांच्यावर टाकली. सभापती सिरवानी हे स्वतः दोन उशी घेऊन सभेत गेले होते. त्यांनी या उशीची किंमत ९०० रुपये आहे का? असा प्रश्न आयुक्तांना करून वस्तूच्या किंमतीवर प्रश्नचिन्हे निर्माण केले. दरम्यान खरेदी करण्यात येणाऱ्या वस्तूची किंमत अव्वाच्या सव्वाच्या असल्याची कुजबुज शहरात सुरू झाली.

 महापालिकेच्या बंद पडलेल्या आरोग्य केंद्रातील ५०० पेक्षा जास्त बेड, गाद्या, उशी, चादर पडून असताना नवीन खरेदी कशासाठी? असा उपस्थित झाला. खरेदी करण्यात येणार असलेल्या एका गादीची किंमत १० हजार, बेड-१९ हजार ५००, उशी- ९००, चादर व बेडशीट प्रत्येकी-६०० तर उशी कव्हर १८० रुपये दाखविण्यात आली. इतर वस्तूच्या किंमतीही अश्याच सव्वाच्या सव्वा असल्याची टीका होत आहे. काँग्रेस पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी वस्तूच्या किमतीवर प्रश्नचिन्हे उपस्थिती करून वस्तू ई-टेंडर नुसार थेट कंपनीकडून मागवून महापालिका व शासनाचे पैसे वाचवा. असे पत्र महापालिका आयुक्त, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, महापालिका सचिवांना दिले. एकूणच अव्वाच्या सव्वा किमतीच्या वस्तू खरेदीच्या प्रस्तावाला स्थायी समिती सभेत मंजुरी दिली असलेतरी वस्तूच्या किमती बाबत उलटसुलट चर्चेला सुरवात झाली. अखेर...रुग्णालयाचे स्वप्न पूर्ण महापालिका दोन रुग्णालय, लॅब व ऑक्सिजन प्लॅन्ट साठी खरेदी करण्यात येत असलेल्या ११ कोटीच्या साहित्य व वस्तूवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले. तर दुसरीकडे महापालिकेचे स्वतःचे रुग्णालय उभारण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याने राजकीय सर्वपक्षीय नेते, पालिका अधिकारी, नागरिक, सामाजिक संस्था आदींनी आनंद व्यक्त केला. शहरवासीयांना हक्काचे रुग्णालय मिळणार असून रुग्णालयात अध्यावत सुखसुविधा राहण्याचे संकेत महापालिका अधिकार्यांच्या दिले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर