शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उपेक्षित आयुष्यामुळे केला खुनासह बलात्कार, अटकेनंतर केले पोलिसांचेच अभिनंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 06:38 IST

अंबरनाथ येथे प्रियकराचा खून करून, प्रेयसीवर बलात्कार करणा-या आरोपीला उपेक्षित आयुष्य नशिबी आल्याचा संताप होता. या संतापातूनच केलेल्या या गुन्ह्यामध्ये त्याने कुणाचीच मदत घेतली नव्हती.

ठाणे : अंबरनाथ येथे प्रियकराचा खून करून, प्रेयसीवर बलात्कार करणा-या आरोपीला उपेक्षित आयुष्य नशिबी आल्याचा संताप होता. या संतापातूनच केलेल्या या गुन्ह्यामध्ये त्याने कुणाचीच मदत घेतली नव्हती. त्यामुळे आपणास अटक होणार नाही, हा फाजील आत्मविश्वास असलेल्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या, तेव्हा त्याने या कामगिरीबद्दल चक्क पोलिसांचे अभिनंदन केले.अंबरनाथजवळच्या चिंचपाडा येथून नालंबीकडे जाणा-या रोडवर एका युवकाचा बंदुकीने खून करून, त्याच्या प्रेयसीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी संजय सिद्धार्थ नरवडे (२५) याला ठाणे ग्रामीण पोलिसांनी रविवारी शिताफीने अटक केली. त्याच्याजवळून परदेशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर, काही जिवंत काडतुसे, खून केलेल्या युवकाचा मोबाइल फोन, त्याच्या मोटारसायकलची चावी आणि इतर साहित्य हस्तगत केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.आरोपी मूळचा जालनातीलअंबड तालुक्यातील गोंदी येथील रहिवासी असून, आईवडिलांशी पटत नसल्याने, तो उल्हासनगरातील प्रशिक गेस्ट हाउसमध्ये राहत होता. तो रिक्षा चालक असून, दहावी पास आहे. प्रियकराचा खून, प्रेयसीवर बलात्कार केल्यानंतर त्याने प्रियकराचा मोबाइल घेतला. तो लॉजजवळच एका उत्तर प्रदेशच्या रहिवाशाला विकला. ही माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी शिताफीने त्याला अटक केली.>आणखी एक गुन्हाशिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षी अशाच प्रकारचा एक गुन्हा घडला होता. या घटनेमध्ये आरोपीने एका प्रियकर आणि प्रेयसीला बंदुकीच्या धाकावर लुटले होते. मात्र, ते घटनास्थळ गजबजलेले असल्याने, प्रेयसी आरोपीच्या तावडीतून सुटली होती. आरोपीच्या अटकेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील हा गुन्हादेखील उघडकीस आला आहे.

टॅग्स :Policeपोलिस