शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या नियोजना अभावी नाट्यगृहात गोंधळ

By धीरज परब | Updated: August 8, 2023 18:52 IST

नाटकांच्या वेळां वरून उडालेल्या गोंधळास भाषिक आणि राजकीय वळण 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहात दोन नाटकांच्या वेळांचे नियोजन ओढूनताणून करण्याचा प्रशासनाचा खटाटोप अंगलट आला आहे . यातून  त्याला भाषिक आणि राजकीय वळण लागून नवीन वाद निर्माण झाला आहे . 

काशीमीरा महामार्गावर असलेल्या पालिकेच्या लता मंगेशकर नाट्यगृहात तब्बल १० महिन्यांनी पहिले मराठी नाटक झाले . रविवार ६ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वा. करून गेलो गाव ह्या मराठी नाटकाचा हाऊसफुल्ल प्रयोग झाला . मात्र सदर नाटकाच्या बुकिंग आधीच महापालिकेने त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता राजस्थानी भाषेतील खाटु श्याम नाटकाची बुकिंग कित्येक दिवस आधीच घेऊन ठेवली होती . 

वेळ जुळत नसताना देखील महापालिकेच्या संबंधित कर्मचारी - अधिकारी यांनी दोन्ही नाटकांची बुकिंग घेतली . त्यामुळे गोंधळ होणार हे लक्षात आल्यावर खाटु श्याम नाटकाच्या आयोजकांना ५ ऐवजी साडे पाच वाजताची वेळ करा अशी सूचना पालिकेने केली असता आयोजकांनी ती मान्य केली . 

परंतु करून गेलो गाव हे नाटकच मुळात अडीज ते पावणे तीन तासांचे असून पहिलाच प्रयोग असल्याने लोकांचा सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद होता . तर दुसरीकडे खाटु श्याम नाटकाचे प्रेक्षक सुद्धा ५ वा . चा प्रयोग आहे म्हणून नाट्यगृहाच्या आवारात जमू लागले . एक तास झाला तरी बाहेर जमलेले प्रेक्षक नाट्यगृहात जाण्याच्या प्रतीक्षेत ताटकळत होते . या मुळे काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले . 

सुमारे  ६ . ५ वा . करून गेलो गावचा प्रयोग संपल्या नंतर सव्वा सहाच्या सुमारास खाटू श्यामजी नाटकासाठी आलेल्या प्रेक्षकांना आत मध्ये सोडण्यास सुरवात केली . मुळात मुंबई , ठाणे भागातील नाट्यगृहात नाटकांच्या वेळांचे नियोजन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जाणून घेणे आवश्यक होते . त्यातच महापालिकेने आधीच खाटू श्याम नाटकाच्या प्रयोगाचे बुकिंग घेतले होते. जर वेळेचे नियोजन जमत नसल्याची पूर्ण कल्पना असताना सुद्धा हा खटाटोप केल्याने वादंग निर्माण झाल्या बद्दल नाट्यरसिकांनी नाराजी व्यक्त केली आहे . 

महापालिके कडून रविवार ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वा . राजस्थानी भाषेतील खाटू श्याम नाटका साठी मंगेशकर नाट्यगृहची बुकिंग कित्येक दिवस आधी करण्यात आली होती . मात्र महापालिकेने नंतर मराठी नाटक करून गेलो गाव ला देखील ६ ऑगस्ट रोजीची ३ . ३० वा. ची बुकिंग दिली . वेळेचे नियोजन होत नसताना देखील बुकिंग देऊन गोंधळ व नवीन वाद यातून निर्माण झाला . 

५ वा . ची वेळ असताना साडेसहा वाजले तरी खाटू श्याम नाटकासाठी आलेल्या प्रेक्षकांना बाहेरच ताटकळत रहावे लागल्याने आमदार गीता जैन यांनी पालिका कर्मचारी आनंद गबाळे यांची नाट्यगृहात कानउघाडणी करत असले चुकीचे नियोजन केल्या बद्दल संताप व्यक्त केला . गबाळे यांनी चूक झाल्याचे मान्य करत दिलगिरी देखील व्यक्त केली . महापालिकेच्या वेळेच्या नियोजना अभावी हा गोंधळ उडाल्याने संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाईचे पत्र आ . जैन यांनी आयुक्तांना दिले . नाटकांच्या वेळा आणि दोन प्रयोगातले अंतर आदींचा विचार करूनच नाटकांची बुकिंग घेणे आवश्यक असताना अधिकाऱ्यांनी कर्तव्यात जाणीवपूर्वक कसुर करून भाषिक वाद निर्माण होण्याचे वातावरण केले आहे . हि अतिशय गंभीर बाब असल्याचे आ . जैन यांनी सांगितले . 

दरम्यान मंगळवारी आमदार प्रताप सरनाईक यांनी शिष्टमंडळासह आयुक्त दिलीप ढोले यांची भेट घेतली . मराठी नाटकाच्या वेळी इतर कोणीही येऊन अशा प्रकारे मराठी नाटकावर अरेरावी करण्याचा प्रयत्न केला , मराठी नाटक बंद पाडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सहन करणार नाही. रविवारी नाट्यगृहात मराठी नाटकाच्या बाबतीत झालेल्या प्रकारा नंतर मराठी भाषिकात नाराजी आहे. वेळ पडल्यास मराठी भाषिकांसाठी आणि मराठी अस्मितेसाठी रस्त्यावर उतरू , असा इशारा आ . सरनाईक यांनी दिला. मराठी नाट्य चळवळ वाढावी यासाठी , मराठी नाटकांना महापालिकेने नाट्यगृह भाड्यात अधिक सवलत द्यावी तसेच प्रयोगां साठी प्राधान्य द्यावे  अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली. 

 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर