शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीच्या रकमेसंदर्भातील आघाडीमधील संभ्रम दूर करावा- बाळा नांदगावकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 00:11 IST

Bala Nandgaonkar : जीएसटीच्या रकमेविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री हे वेगवेगळ्य़ा रकमा सांगत आहेत. जीएसटीपोटी ३० हजार कोटी मिळणार आहेत, असे अर्थमंत्री सांगतात.

कल्याण : राज्याला केंद्राकडून जीएसटीपोटी किती रक्कम येणार, याविषयी महाविकास आघाडीत संभ्रम असल्याची टीका मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे. जीएसटीच्या रकमेविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री हे वेगवेगळ्य़ा रकमा सांगत आहेत. जीएसटीपोटी ३० हजार कोटी मिळणार आहेत, असे अर्थमंत्री सांगतात. मुख्यमंत्री ३८ हजार कोटी येणार आहेत, असे सांगत आहेत. तर, कोणी सांगते ६० हजार कोटी रुपये मिळणार. परंतु, नक्की किती पैसे येणार, याबाबत संभ्रम असून, तो सरकारने दूर करावा, याकडे नांदगावकर यांनी लक्ष वेधले आहे. महाविकास आघाडीने एकत्रित येऊन आधी ठरवावे. राज्याच्या तिजोरीत पैसा नाही. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी हजारो कोटी रुपये लागतात. सरकारच्या शिरावर हजारो कोटींचे कर्ज आहे. पैसै आणणार कुठून, असा प्रश्न आहे. एका बाजूने सगळे बंद आहे. हळूहळू सगळे व्यवहार सुरू करा. आम्ही म्हणत नाही की डोक्यावर कर्ज घ्या, असे ते म्हणाले. मनसे हा पक्ष ग्रास रूटवर उतरून काम करतो. कोरोनाकाळात मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. स्वत:च्या खिशात हात घालून गरजूंना मदत केली. मनसेचा कार्यकर्ता सामान्यांच्या मदतीसाठी कुठेही कमी पडलेला नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत जनतेने याची जाणीव ठेवून मनसेच्या पाठी उभे राहिले पाहिजे. कल्याण-डोंबिवली व ग्रामीण भागांत मनसेचे आमदार राजू पाटील हे चांगले काम करीत आहे. नाशिकला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जे विकासकाम करून दाखविले, त्याची जाणीव जनतेने ठेवून मनसेला साथ दिली पाहिजे, अशी अपेक्षा नांदगावकर यांनी व्यक्त केली.

‘पाटील यांच्या हत्येचा योग्य तपास करा’नांदगावकर यांनी मनसेच्या शिष्टमंडळासह अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रेय कराळे यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी मनसेचे पदाधिकारी राकेश पाटील यांच्या हत्येचा योग्य प्रकारे तपास केला जावा, त्याचबरोबर उल्हासनगरातील मनसेचे कार्यकर्ते मनोज शेलार यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींनाही अटक करावी, अशी मागणी नांदगावकर यांनी केली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणBala Nandgaonkarबाळा नांदगावकर