शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

सांस्कृतिक नगरीतच मनोरंजनाचा ठणठणाट; आचार्य अत्रे रंगमंदिर वर्षभरापासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 00:19 IST

देखभाल दुरुस्तीसाठी कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिर तब्बल वर्षभरापासून बंद असताना आता डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचा पडदाही शुक्रवारपासून पडणार आहे.

- प्रशांत मानेकल्याण : देखभाल दुरुस्तीसाठी कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिर तब्बल वर्षभरापासून बंद असताना आता डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचा पडदाही शुक्रवारपासून पडणार आहे. नाट्यगृहाला टाळे लागल्याने सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेल्या कल्याण-डोंबिवलीत मनोरंजनाचा ठणठणाट झाला असून त्यामुळे रसिकांचा हिरमोड झाला आहे.कल्याण येथील सावित्रीबाई नाट्यगृह दुरुस्तीसाठी बंद करून वर्ष उलटले. मात्र, प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नव्हती. दुरुस्तीच्या निविदेला योग्य तो प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे काम सुरू व्हायला विलंब लागत होता. अखेर, या कामाचे तीन टप्प्यांत विभाजन करण्यात आले आणि त्याप्रमाणे प्रत्येक कामाची स्वतंत्रपणे निविदा मागवल्यानंतर कंत्राटदारांचा प्रतिसाद मिळाला. आता दुरुस्तीचे काम पूर्ण होत आले असून केवळ रंगरंगोटीचे काम बाकी आहे. २८ आॅगस्टला अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्यकलाकार संघाचे अध्यक्ष प्रदीप कबरे यांनी रंगमंदिराच्या कामाची पाहणी केली होती. या कामाबाबत समाधान व्यक्त करताना कामाला विलंब लागला तरी चालेल, पण कोणत्याही त्रुटी राहता कामा नये, अशा सूचना त्यांनी केल्या होत्या. दरम्यान, मंगळवारी महापौर विनीता राणे आणि शहरअभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी अत्रे रंगमंदिराची पाहणी करून कामाचा आढावा घेतला. काम जवळपास पूर्ण होत आल्याने १ आॅक्टोबरला म्हणजेच केडीएमसीच्या वर्धापनदिनी हे नाट्यगृह रसिकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने अत्रे रंगमंदिर व्यवस्थापनाकडून तारखांचे वाटपही करण्यात आले आहे.गणेशोत्सवादरम्यान होणार फुले नाट्यगृहाचे काम, वातानुकूलित यंत्राचीही दुरूस्तीसावित्रीबाई फुले नाट्यगृहामधील वातानुकूलित यंत्र नादुरुस्त झाल्याने दिवाळीपासून भाडेतत्त्वावर घेतलेल्या वातानुकूलित यंत्रावर काम सुरू होते. ही मुदत शुक्रवारी संपुष्टात येत असल्याने शनिवारपासून नाट्यप्रयोग आणि अन्य कार्यक्रमांसाठी नाट्यगृह देण्यात येऊ नये, अशा सूचना प्रशासनाकडून व्यवस्थापनाला देण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्यांच्याकडून ७ सप्टेंबरपर्यंतच नाट्यगृह खुले ठेवण्यात आले आहे. शनिवारपासून याठिकाणी नाट्यप्रयोग अथवा कार्यक्रम होणार नाही. याच महिन्यात गणेशोत्सव आहे. या कालावधीत शक्यतो नाट्यप्रयोग होत नाहीत. त्यामुळे महापालिका या काळात हे काम उरकून घेणार आहे. परिणामी नाट्यगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून याचदरम्यान वातानुकूलित यंत्राचे कामही केले जाणार आहे. या कामाला तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. यासंदर्भात केडीएमसीचे शहरअभियंता प्रमोद कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भाडेतत्त्वावर घेतलेल्या वातानुकूलित यंत्रांची मुदत संपल्याने नाट्यगृह बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.केमिकल झोनचा फटका : फुले नाट्यगृह एमआयडीसी भागात आहे. येथील रासायनिक कंपन्यांकडून होणाऱ्या प्रदूषणामुळे नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रे लवकर नादुरुस्त झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता येथे अत्रे रंगमंदिराच्या धर्तीवर चिलर वातानुकूलित यंत्र बसवण्यात येणार आहे.

टॅग्स :thaneठाणेkalyanकल्याण