ग्रामीण भागातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाचे शर्तीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:40 AM2021-05-14T04:40:01+5:302021-05-14T04:40:01+5:30

ठाणे : ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद प्रशासनासह आरोग्य विभागाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ...

Conditional efforts by the Department of Health to prevent corona outbreaks in rural areas | ग्रामीण भागातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाचे शर्तीचे प्रयत्न

ग्रामीण भागातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाचे शर्तीचे प्रयत्न

Next

ठाणे : ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद प्रशासनासह आरोग्य विभागाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पाच तालुक्यांतील ग्रामीण भागात तीन हजार ६८६ प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आली असून त्यापैकी तीन हजार १६४ प्रतिबंधित क्षेत्रांचा १४ दिवसांचा कार्यकाल पूर्ण झाला आहे. ८३० पथकांमार्फत ८७ हजार ४१० घरांचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातील करोना रुग्णांचा शोध घेणे सोपे झाले असून करोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर कायम आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहरी भागात मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाने शिरकाव केला. त्यावेळी ग्रामीण भागात अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड या तालुक्यांमध्ये सुरुवातीच्या काळात दररोज १० पेक्षा कमी रुग्ण आढळून येत होते. मात्र, मे, जूनपासून सप्टेंबरपर्यंत ग्रामीण भागात बाधितांच्या व या आजाराने मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत गेली. याची गांभीर्याने दखल घेत, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून उपाययोजना करण्यात आल्याने ऑक्टोबरपासून रुग्णसंख्या आटोक्यात आली. यंदा मार्च २०२१ मध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या पाच ते सहा हजारांच्या घरात पोहोचली. मृत्यू १० ते १५ वरून थेट ६० ते ६८ च्या घरात पोहोचले. ग्रामीण भागात यंदा अधिक वेगाने फैलाव होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येची साखळी तोडण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून रुग्ण आढळणाऱ्या ठिकाणी १४ दिवस प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून आरोग्य पथकांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यातील रुग्ण आढळून येणाऱ्या तीन हजार ६८६ ठिकाणांना प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले. त्यापैकी तीन हजार १६४ प्रतिबंधित क्षेत्रांचे १४ दिवसांचे सर्वेक्षण पूर्ण झाले. या भागातील ८७ हजार ४१० घरांमध्ये राहणाऱ्या चार लाख सात हजार २९० नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाच्या वतीने देण्यात आली.

दरम्यान, ग्रामीण भागात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३१ हजार सात असून त्यापैकी २६ हजार ७८० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तीन हजार ४६५ रुग्ण उपचारार्थ विविध कोविड केअर सेंटर आणि हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्याबरोबरच मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर कायम आहे.

..........................

चौकट :-

तालुका, एकूण रुग्ण, कोरोनामुक्त, दाखल रुग्ण, मृत्यू

अंबरनाथ - ३००८ - २७७२ - १६५ - ७१

कल्याण - ९३११ - ८३४४ - ७९५ - १७२

भिवंडी - ११३१९ - ९५४२ - १४९९ - २७८

शहापूर - ५२८५ - ४५१३ - ६०० - १७२

मुरबाड - २०८४ - १६०९ - ४०६ - ६९

......................

Web Title: Conditional efforts by the Department of Health to prevent corona outbreaks in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.