उमेश जाधव, टिटवाळामहाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत कल्याण विभागातील टिटवाळा रेल्वे स्थानक ते सिद्धिविनायक गणेश मंदिर या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी २०.३८ कोटींचा निधी मंजूर झाला होता. मात्र, काम पूर्ण होण्याआधीच या रस्त्यावर खड्डे पडायला सुरु वात झाली आहे. या कामाची मुदत ३० जून २०१५ अशी होती. मात्र, मुदतवाढ समाप्त होऊन तीन महिने उलटूनही अद्यापही रस्त्याचे काम अपूर्णावस्थेतच आहे. यामुळे होणारे अपघात, रस्त्यात येणाऱ्या झाडांची बेमालूम कत्तल आणि फूटपाथ तयार होण्याअगोदरच फेरीवाल्यांनी केलेल्या अतिक्रमणांनी नागरिकांना यातनाच भोगाव्या लागत आहेत. युटिलिटीत येणाऱ्या अनेक कामांचा अंदाज आणि नियोजनच नसल्याने सदर रस्त्याच्या कामासाठी अतिरिक्त दीड कोटीचा निधी वाढला असल्याचेही दिसून आले. पालिका प्रशासनाने चालवलेली ही लूट आहे, असा संतप्त सूर यामुळे येथील नागरिकांमधून निघत आहे.--------रस्त्याचे काम चालू झाले तेव्हा खोदकामातून जी माती निघेल, ती रेल्वे फाटक ते अभिलाषा पार्कया परिसरातील रस्त्यासाठी भराव म्हणून वापरण्यात यावी, जेणेकरून या रस्त्याच्या कामातील जवळजवळ लाखोंचा निधी वाचवता येईल, असे ठरले होते. मात्र, ठेकेदारांनी असे न करता ही माती परस्पर येथील बिल्डरांना विकली आहे. तसेच आपण याबाबत तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनावणे यांच्याशी पत्रव्यवहारही केला होता. त्यांनी याबाबत चौकशीचे आदेशही दिले होते. या रस्त्याच्या जागेत माझीही जागा येत असून यासाठी टीडीआरची मागणी केलेली आहे. याबाबत, पालिका प्रशासन जोपर्यंत समाधानकारक प्रतिसाद देत नाही, तोपर्यंत या कामास हरकत राहणार आहे. - बुधाराम सरनोबत, माजी उपमहापौर, कडोंमपा
काँक्रि टीकरणाचे भिजत घोंगडे..
By admin | Updated: October 1, 2015 23:39 IST