शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘अपघात मुक्त ठाणे जिल्हा’ संकल्पना साकारण्यासाठी एकत्रित प्रयत्न गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 01:08 IST

अपघातमुक्त ठाणे जिल्हा हे ब्रिदवाक्य प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे, असे आवाहन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी बुधवारी येथे केले. जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट शोधून त्यावर उपाययोजना करण्यासंदर्भात रेजिलंट इंडिया या संस्थेने यावेळी सादरीकरण केले. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे यांनी बैठकीचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले.

ठळक मुद्देकेंद्रीय मंत्री कपिल पाटीलठाणे जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात यावे. तसेच अपघातमुक्त ठाणे जिल्हा हे ब्रिदवाक्य प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे, असे आवाहन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी बुधवारी येथे केले.जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक बुधवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली. त्यावेळी पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रु पाली सातपुते, ठाण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे, हेमांगिनी पाटील आदी उपस्थित होते. तर आमदार गणपत गायकवाड, कुमार आयलानी, कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलाश पवार आदी यावेळी उपस्थित होते.सामान्यांकडून होणारे नियमांचे उल्लंघन, अपघाती मृत्युदर कमी करणे आदी विषयांवर चर्चा करून यासंबंधी काय नाविन्यपूर्ण उपाय आपण करू शकतो, याबाबतचे मार्गदर्शन करून पाटील म्हणाले की, गेल्या काही काळात रस्ते अपघात कमी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे ठाणे जिल्ह्यात अपघात कमी होत आहेत. मात्र, अपघात मुक्त ठाणे जिल्हा करण्यासाठी अधिक प्रयत्न करून जिल्ह्याचे नावलौकिक वाढवावे. ठराविक महिन्यात तसेच ठरविक वेळतच जास्त अपघात का होतात, याचे विश्लेषण करावे. तसेच नागरिकांमध्ये नियम पाळण्यासंदर्भाची मानसिकता तयार करणे आवश्यक आहे. ब्लॅक स्पॉट कमी करून ठाणे जिल्हा झिरो टॉलरन्स सेफ रोड महाराष्टÑ करण्यासाठी सर्व संबंधितांनी प्रयत्न करावेत, असेही आवाहन त्यांनी केले.जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर म्हणाले की, राज्यातील महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग हे ठाणे जिल्ह्यातून जातात. त्यादृष्टिने हा जिल्हा महत्त्वपूर्ण आहे. रस्ते सुरक्षा विषयक कामांमध्ये जिल्ह्याने गेल्या वर्षी उत्कृष्ट काम केले आहे. यापुढील काळातही यापेक्षा अधिक चांगले काम केले जावे. रस्ते सुरक्षासंबंधी ज्या उपाययोजना राबविल्या जातात, त्याची योग्य प्रकारे अमंलबजावणी व्हावी. रस्ते अपघात कमी करण्यासाठी संबंधित विभागांनी एकत्र येऊन रस्त्यांवरील ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी उपाय योजावेत. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आमदार गायकवाड आणि अयलानी यांनी रस्ता सुरक्षेच्या दृष्टिने सूचना केल्या. जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट शोधून त्यावर उपाययोजना करण्यासंदर्भात रेजिलंट इंडिया या संस्थेने यावेळी सादरीकरण केले. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे यांनी बैठकीचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले.

 

 

टॅग्स :thaneठाणेRto officeआरटीओ ऑफीस