शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
2
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
3
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
4
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
5
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
6
अचानक बेपत्ता झाली होती बॉलिवूड अभिनेत्री; ११ महिन्यांनी सापडला हाडांचा सांगाडा
7
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
8
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
9
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
10
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
11
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
12
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
13
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
14
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
15
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
16
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
17
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
18
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
19
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
20
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य

तंत्रज्ञानामुळे वैचारिक गुलामी- अरविंद जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 12:11 AM

अंबरनाथमध्ये ‘कोमसाप’च्या राज्यस्तरीय युवाशक्ती संमेलनाचे उद्घाटन

अंबरनाथ : विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आधार घेऊन प्रत्येकाने आपल्यात चांगले बदल करणे गरजेचे आहे. मात्र आज तरूण पिढी या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करत असल्याने त्यांच्यात वैचारिक गुलामी वाढली आाहे. आजचा तरूण केवळ मोबाइलवर स्वत:ला व्यक्त करत आहे. मोबाइलमधून तरूणांना बाहेर काढण्यासाठी प्रत्येक ठिकाणी युवाशक्ती साहित्य संमेलनाची गरज आहे. अंबरनाथमध्ये हा प्रयत्न यशस्वी झाला असून त्याचे अनुकरण इतर ठिकाणीही करणे गरजचे आहे, असे मत प्रसिध्द लेखक अरविंद जगताप यांनी शनिवारी व्यक्त केले.अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या सभागृहात कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पुढाकाराने राज्यस्तरीय युवाशक्ती साहित्य संमेलन भरवण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन जगताप, कोमसापचे संस्थापक मधु मंगेश कर्णिक, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आाणि स्वागताध्यक्ष सुनील चौधरी यांच्या हस्ते झाले. युवकांचा साहित्याकडे कल वाढावा यासाठी हे संमेलन भरविण्यात आले आहे. संमेलनाच्या उद्घाटनासाठी तरूणांची गर्दी झाली होती.जगताप यांनी मत व्यक्त करताना तरूणांना केंद्रस्थानी ठेवत अनेक महत्वाचे सल्ले दिले. आज युवकांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही त्यामुळे तरूणांना कोणता झेंडा हाताात घेऊ असे विचारावे लागते. तरूणांनी आपल्या वाटचालीत कोणताही झेंडा हाती घेतला तरी त्या झेंड्याचा दांडा मात्र विकासाचाच राहिल याची दक्षता घ्यावी. राजकीय क्षेत्रातील तरूणांचा वावर कसा असावा यावरही त्यांनी आपले मत व्यक्त केले. आजची तरूण पिढी ही संवेदनशील आहे. मात्र त्यांची संवेदना ही मोबाइलमध्येच अडकून पडली आहे.मोबाइल आणि व्हाटस्अ‍ॅपच्या जमान्यात युवा पिढी हरवून गेली आहे. तरूणांमध्ये विनाोद बुध्दीही कमी झाली आहे. एखादा जोक समजण्यासाठी स्माईलीचा वापर करावा लागतो. त्याशिवाय जोकचा अर्थ समजत नाही. आज मोबाइलचा वापर करून स्वत:मध्ये अनेक चांगले बदल घडविणे शक्य आहे. मात्र विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील विकासामुळे गुलाम बनवण्याचे तंत्र विकसित झाले आहे, असे जगताप यांनी सांगितले. आजही जुन्या मानिसकतेचा पगडा कायम असून साहित्य संमेलन युवकांमध्ये बदल घडवू शकतील. एकमेकातील हरवत चाललेला संवाद पुन्हा सुरू होईल असा आशावाद जगताप यांनी व्यक्त केला. तरूणांना व्यक्त होण्यासाठी सातत्याने संधी दिल्यास भावी तरूण पिढी साहित्याचा गाढा अविरतपणे सुरू ठेवतील असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी अंबरनाथसारख्या शहरात साहित्य संमेलनाला चांगला वाव निर्माण झाला आहे. आजही या ठिकाणी संमेलनाला गर्दी जमते. अंबरनाथ आणि साहित्य यांचे बंधन सुनील चौधरी हे यापुढेही सांभाळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.अंबरनाथ शहराला सामाजिक ,साहित्यिक आणि ऐतिहासिक वारसा असून सध्याच्या काळात साहित्य संमेलनांची जास्त गरज आहे. आज तरूणांसाठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. या संधीचा तरूण साहित्यिक फायदा घेतील असा विश्वास मधु मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केला. या संमेलानाला आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्ष मनीषा वाळेकर, अब्दुल शेख, तुकामराम म्हात्रे, कोमसापचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळुस्कर आदी उपस्थित होते.ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटनमहात्मा गांधी विद्यालयात सुरू असलेल्या युवाशक्ती साहित्य संमेलानाच्या उद््घाटनप्रसंगी ग्रंथ प्रदर्शनही भरवण्यात आले आहे. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन अरविंद जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रदर्शनात विविध विषयांवरील पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शनिवारी पहिल्या दिवशी प्रदर्शनाला रसिकांनी मोठ्या संख्येने भेट दिली.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानSocial Mediaसोशल मीडिया