शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

वर्तकनगर परिसरात सर्वंकष स्वच्छता अभियान; मुख्य रस्त्यांची केली स्वच्छता

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: January 7, 2024 16:45 IST

ठाणे महापालिकेच्या वतीने सर्वंकष स्वच्छता अभियान शनिवारी महापालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समिती कार्यक्षेत्रात राबविण्यात आले.

ठाणे: ठाणे महापालिकेच्या वतीने सर्वंकष स्वच्छता अभियान शनिवारी महापालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समिती कार्यक्षेत्रात राबविण्यात आले. या मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांसमवेत विविध सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक, एनसीसीचे विद्यार्थी तसेच वर्तकनगर परिसरात राहणारे नागरिक सहभागी झाले. वर्तकनगरमधील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, पाइपलाइन परिसर, नाले, दुभाजक, फूटपाथची साफसफाई तसेच रस्ते पाण्याने धुऊन स्वच्छ करण्यात आले.

महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे उपायुक्त, सहायक आयुक्त यांच्या देखरेखीखाली सकाळी सहा वाजता या सर्वंकष स्वचछता अभियानास प्रारंभ करण्यात आला. या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी नगरसेविका परिषा सरनाईक, जयश्री डेव्हिड, विमल भोईर, स्नेहा आंब्रे, आदी सहभागी झाले होते. वर्तकनगर प्रभाग समितीअंतर्गत येऊर परिसरातील फॉरेस्ट गेट ते रिक्षा स्टँड, पाटोणापाडा, रोनाचा पाडा ते शामियाना हॉटेल, जंगल कॅम्प, एक्झोटिका हॉटेल ते पाटील बंगला, पाचगल्ली, शिवाईनगरमधील देवदया सर्कल ते राघोजी भांगरे चौक, शास्त्रीनगर, देवदयानगर, रामबाग परिसरातील उपवन इंडस्ट्रीज, टीएमटी डेपो, पायलादेवी, उपवन मैदान, कॅडबरी परिसरातील कॅडबरी सिग्नल ते माजिवडा सिग्नल हायवे, माजिवडा नाका, लक्ष्मी चिरागनगर, पोखरण रोड नं. २ येथील गांधीनगर पाण्याची टाकी परिसर, माजिवडा ते तत्त्वज्ञान विद्यापीठ, पेपर प्रॉडक्ट कंपनी, गांधीनगर, माजीवडा सर्कल मेट्रो पिलर, तुळशीधाम परिसरातील वसंत विहार, हाईड पार्क, धर्मवीरनगर, हिरानंदानी मेडोज, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, जयभवानीनगर, कोकणीपाडा, टिकुजिनीवाडी, आंब्रे सर्कल, प्रेस्टीज सोसायटी, वसंतविहार, पवारनगर, नळपाडा गांधीनगर, गावंडबाग, कोकणीपाडा, भीमनगर, वर्तकनगर, समतानगर, आदी परिसरांतील अंतर्गत रस्ते, मुख्य रस्त्यांची साफसफाई करण्यात आली. या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, सहायक आयुक्त तसेच विभागप्रमुख व महापालिका कर्मचारीदेखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपवन परिसराची पाहणीसर्वंकष स्वच्छता मोहिमेदरम्यान आयुक्त अभिजित बांगर यांनी संपूर्ण उपवन तलावाची पाहणी केली. उपवन तलाव येथे सुरू असलेले सुशोभीकरण, विसर्जन घाट तसेच संपूर्ण परिसराची पाहणी करत असताना सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. 

टॅग्स :thaneठाणे