शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आधी रखडलेले रस्ते प्रकल्प पूर्ण करा अन् मगच सहा पदरी रस्त्यांची घोषणा करा- राजेश कदम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 22:46 IST

कल्याण-डोंबिवलीमधील सत्ताधारी शिवसेनेचा नवीन रस्ता बांधणीचा इतिहास जर बघितला तर त्यांचे नाव वेळकाढू व जास्तीत जास्त वर्षं रस्त्याचे काम पूर्ण करणा-या जागतिक विक्रमात अव्वल स्थानी असेल.

डोंबिवली: कल्याण-डोंबिवलीमधील सत्ताधारी शिवसेनेचा नवीन रस्ता बांधणीचा इतिहास जर बघितला तर त्यांचे नाव वेळकाढू व जास्तीत जास्त वर्षं रस्त्याचे काम पूर्ण करणा-या जागतिक विक्रमात अव्वल स्थानी असेल. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वस्तुस्थितीचा अभ्यास करावा आणि त्यानंतरच नव्याने भिवंडी-कल्याण फाटा ते शिळफाटा या सहापदरी रस्त्याची घोषणा करावी, असा टोला मनसे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी लगावला. कदम यांनी नव्या प्रकल्पांच्या घोषणोवर टीकास्त्र करतांना हा निर्णय देखील बिल्डरधार्जिणा असल्याचे म्हटले.पालकमंत्री शिंदेंना उद्देशून रखडलेल्या प्रकल्पांबाबत माहिती देताना ते म्हणाले की, गोविंदवाडी बायपास तब्बल 8 वर्षं तरीही अद्याप अपूर्ण, डोंबिवली पूर्व पश्चिम जोडणारा ठाकुर्ली रेल्वे पूल व रस्ता 14 वर्षं तरीही अद्याप अपूर्ण, कल्याण पत्री पूल ते ठाकुर्ली रेल्वे समांतर रस्ता 18 वर्षं अद्यापही अपूर्ण व सदर रस्त्याचे काम शिवसेनेच्याच एका मोठ्या पदाधिका-याने जागेचा योग्य मोबदला मिळावा म्हणून गेले 11 महिने अडवून ठेवल्याचे कळत असल्याचा आरोप त्यांनी केला.रेती बंदर मानकोली खाडी पूल रस्ता काम सुरू, पण प्रगती वादात अडकल्याचे कळते, अजून किती वर्ष जातील माहीत नाही. कल्याण-ठाणे रेल्वे समांतर रस्ता, हा रस्ता गेले 20 वर्ष फक्त वचननाम्यापूर्ती दिसून येतो. अशी वर्षानुवर्ष अपूर्ण रस्त्यांची अनेक उदाहरणे देता येतील जी शिवसेनेच्या ढिसाळ सत्ता काळात अपूर्ण, रखडलेली, निकृष्ट व लागलेला वर्षांनुवर्षाचा कालावधी हे पाहता शिवसेनेचे नाव जागतिक विक्रमात नोंदावे लागेल, असेही ते म्हणाले. आता सहापदरी शीळफाट्याचे नवीन स्वप्न पालकमंत्री घेऊन आले, कारण पूर्वीचे एलिवेटेडचे स्वप्न मेट्रो 5 ने उडवले असेल, सहा पदरी करताना किती बांधकामे हटवावी लागतील ह्याची कल्पना त्यांना असेलच, असेही ते म्हणाले.मध्यंतरी मागील आयुक्त ई.रविंद्रन ह्यांनी जे कल्याण शीळ रोड ला रस्ता रुंदीकरणाची धडक कारवाई केली होती, त्यावर हे सत्ताधारी शिवसेना रस्ता बांधू शकली नाही, सहा पदरी रस्ता तर खूप लांबची गोष्ट असल्याचे ते म्हणतात. सहापदरी रस्ता कराल तेव्हा कराल आधी गेले 8 महिने शिवसेनेने अडवलेला पत्रीपूल कचोरे खंबाळपाडा रेल्वे समांतर रस्ता पूर्ण करावा, असे आवाहनही कदम यांनी केले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना