शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सुरू असलेली कामे 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करा - ठाणे महापालिका आयुक्तांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 17:39 IST

शहरातील महत्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याबरोबरच सुरू असलेली कामे 15 ऑक्टोबर्पयत पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. मात्र ही करताना कामाच्या दर्जामध्ये कुठलीही तडजोड करणार नाही असा इशाराही त्यांनी या बैठकीत दिला.

ठाणे - शहरातील महत्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याबरोबरच सुरु असलेली कामे 15 ऑक्टोबर्पयत पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. मात्र ही करताना कामाच्या दर्जामध्ये कुठलीही तडजोड करणार नाही असा इशाराही त्यांनी या बैठकीत दिला.बुधवारी सांयकाळी नागरी संशोधन केंद्र येथे तब्बल चार तास मॅरेथॉन बैठक घेतल्यानंतर त्यांनी हे आदेश संबधींत विभागांना दिले. नागरी कामांशी संबंधित सर्व अधिकारी आणि ठेकेदार यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत त्यांनी कळवा खाडी पूल, एकात्मिक नाले विकास, सिमेंट कॉंक्रीटीकरण, विकास आराखड्यातील रस्त्यांचे नुतनीकरण, युटीडब्लूटी पद्धतीने रस्त्यांची कामे, मिसिंग लिंक रोड, मॉडेल रस्ते आदी महत्वाच्या रस्त्याच्या कामाबरोबरच अनेक नागरी प्रकल्पांचाही आढावा घेतला.दरम्यान ठाणो शहरामध्ये महापालिकेची कामे करणा:या ठेकेदारांना पुढच्या बैठकीत त्यांच्याकडे सुरू असलेल्या कामाचे सादरीकरण करण्याच्या सूचना देतानाच त्यांना यापुढे रोजच्या रोज कामाच्या सद्यस्थितीचा अहवाल महापालिकेस सादर करण्याचे निर्देशही दिले.शहरात पोखरण रोड नं. 1, पोखरण रोड नं.2, स्टेशन रोड या महत्वाकांक्षी रस्त्यांसोबतच मॉडेल रोड, मिसिंग लिंक रोड, विकास आराखड्यातील रस्त्यांच्या रूंदीकरणाची आणि नुतनीकरणाची कामे सुरू आहेत. ही सर्व कामे वेळेत पुर्ण करतानाच ती दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, जेणोकरून त्याची लोकांकडून नोंद घेतली जाईल. रस्त्याची डागडुजी, रंगरंगोटी आदी छोट्या छोट्या कामातून चांगला फरक दिसू शकतो असे सांगून तुमच्या कामाची नोंद घेतली जाईल अशा पद्धतीची कामे करा असेही त्यांनी सांगितले. शिवाय सर्व अधिकारी आणि ठेकेदारांनी त्यांच्याकडील कामांना गती देवून ती सर्व कामे पूर्ण करून शहराला देखणो बनविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.  ही दिवाळी तेजोमय व्हावीठाणो शहरात विविध रस्ते प्रकल्प हाती घेवून लोकांच्या अपेक्षा आपण उंचावल्या आहेत. बहुतांशी रस्त्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. ही सर्व कामे 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून लोकांची अपेक्षा पूर्ती करून ठाणोकरांची ही दिवाळी तेजोमय करावी असे भाविनक आवाहनही आयुक्तांनी या बैठकीत केले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका