शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

ठामपा इमारतींचे इलेक्ट्रिक ऑडिट पूर्ण, सुरक्षेच्या दृष्टीने केले उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 01:07 IST

या इलेक्ट्रिक ऑडिटमध्ये ठाणे महापालिकेच्या ज्या ८५ इमारतींमध्ये शाळा भरतात, त्या इमारतींचे ऑडिटदेखील करण्यास सुरु वात झाली असून यामध्ये जवळपास सर्वच शाळांच्या इमारतींचे ऑडिट पूर्ण झाले आहे.

ठाणे : सध्या विविध ठिकाणी आगीच्या घटना वाढत असताना पालिकेने स्वत:च्या इमारतीसुद्धा त्यादृष्टीने सुरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, गडकरी रंगायतन, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, पालिका मुख्यालय इमारत, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि पालिकेच्या सर्व शाळांचे इलेक्ट्रिक सेफ्टी ऑडिट केले आहे. यामध्ये काही त्रुटी आढळल्याने त्यावर उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली. इलेक्ट्रिक त्रुटींमुळेसुद्धा बऱ्याच वेळा आग लागण्याच्या घटना घडल्याचे प्रकार होतात, त्यादृष्टीने पालिकेने ही पावले उचलली आहेत.

या इलेक्ट्रिक ऑडिटमध्ये ठाणे महापालिकेच्या ज्या ८५ इमारतींमध्ये शाळा भरतात, त्या इमारतींचे ऑडिटदेखील करण्यास सुरु वात झाली असून यामध्ये जवळपास सर्वच शाळांच्या इमारतींचे ऑडिट पूर्ण झाले आहे. याशिवाय, रस्त्यांवरील पथदिव्यांचेदेखील ऑडिट करण्यात येत असून हे कामही लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. २० जुलै २०१६ रोजी महापालिका मुख्यालयाच्या तिसºया मजल्यावरील इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रिब्युशन प्लान्टमध्ये आग लागल्याची घटना घडली होती. ती वेळेत विझवली नसती, तर मंत्रालयातील आगीसारखे रूप तिने धारण केले असते. अशीच घटना परिवहनच्या वागळे आगारामध्ये घडली होती. एसीमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली होती. आगीमुळे परिवहन सभापतींच्या अ‍ॅण्टी चेंबरचे मोठे नुकसान झाले. या घटनेनंतर पालिका मुख्यालयाबरोबरच पालिकेच्या इमारतींच्या इलेक्ट्रिक ऑडिटचा मुद्दा उपस्थित झाला होता.आगीच्या दोन घटनांनंतर आली जाग; घेतला निर्णयमुख्यालयाबरोबरच पालिकेच्या इतर इमारतींचे मागील कित्येक वर्षे इलेक्ट्रिक ऑडिट झालेले नसल्याचा त्यावेळी आरोप झाला होता. त्यामुळे या सर्वच इमारतींमधील वायरिंग तसेच एसी कनेक्शनची तपासणी करण्याची गरज निर्माण झाली होती. या दोन आगीच्या घटनांनंतर जाग आलेल्या प्रशासनाने मुख्यालयासह इतर इमारतींचे इलेक्ट्रिक ऑडिट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, मागील सहा महिन्यांपासून या सर्व इमारतींचे इलेक्ट्रिक सेफ्टी ऑडिट केले आहे. आतापर्यंत जवळपास सर्वच इमारतींचे ऑडिट पूर्ण झाले असून यामध्ये अर्थिंग नसणे, काही ठिकाणी इलेक्ट्रिक सप्लाय सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड असणे, अशा अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. यामध्ये मुख्यत्वेकरून इलेट्रिकल सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यादृष्टीने आता गेल्या सहा महिन्यांत या दृष्टीने उपाययोजना करण्यास सुरु वात झाली आहे.

टॅग्स :fireआगThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका