शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

ठाण्यात फोनवरही तक्रारींची ‘आपत्ती’

By admin | Updated: July 3, 2017 06:32 IST

पाऊस असो किंवा नसो ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन क क्षाचा फोन सतत खणखणतो आहे. गेल्यावर्षीच्या जूनपेक्षा यंदा तक्रारींत

पंकज रोडेकर/लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पाऊस असो किंवा नसो ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन क क्षाचा फोन सतत खणखणतो आहे. गेल्यावर्षीच्या जूनपेक्षा यंदा तक्रारींत भर पडली आहे आणि कॉलची संख्याही ६७५ वर गेली आहे.गेल्या तीन महिन्यांत आपत्ती व्यवस्थापनाच्या हेल्पलाईनवर तक्रारीचे तब्बल एक हजार २०१ कॉल आले आहेत. यातील २१४ तक्रारी झाडे पडल्याच्या, तर ७७ पाणी तुंबल्याच्या होत्या. पालिकेत हा कक्ष सुरू झाल्यानंतर नागरिकांनाही त्याची सवय होते आहे. एखादी घटना घडली, प्रश्न-समस्या निर्माण झाली, तर ती लगेचच आपत्ती निवारण कक्षाला कळवण्याचे प्रमाण वाढते आहे. या कक्षाकडे येणाऱ्या तक्रारींची नोंद ठेवण्यासाठी २० कॉलम तयार केले आहेत. त्यात आग, शॉर्टसर्किट, झाडे पडणे, फांदी तुटून पडणे, स्लॅब-प्लास्टर- घर -फुटपाथ, बिल्डींग-तिचा कॉलम, नाला, भिंत आदी पडणे, गॅस गळती, बोगस कॉल, मॉकड्रिल यांचा समावेश आहे. तक्रार आली की त्यानुसार त्यांची लगेचच वर्गवारी होते. तक्रार निवारणासाठी त्याचा फायदा होतो. जुनमध्ये तक्रारींचा पाऊस जून महिन्यात आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या हेल्पलाईनवर तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडला. तर पावसाचे प्रमाण वाढल्याने १ जुलैला ४० विविध तक्रारी आल्या. जूनच्या तक्रारींत २३२ झाडे पडल्याच्या होत्या, ७७ पाणी तुंबण्याच्या तर इतर २४० होत्या. एप्रिल-मेमध्ये ५०० तक्रारी एप्रिल आणि मे महिन्यातही तक्रारींचा ओघ चांगला होता. त्या काळातही ४१ झाडे पडली. तर २६७ इतर तक्रारी, एक बोगस कॉल आला. एकही जीवितहानी नाहीआतापर्यंत कक्षाकडे आलेल्या तक्रारीत काही प्रमाणात वित्तहानीचा तपशील आहे. पण एकही जीवितहानीची घटना नाही. किरकोळ जखमी होण्याचे प्रमाण अधिक आहे. ४० जणांची फौज तैनात आपत्तीचा सामना करण्यासाठी ४० जणांची फौज तयार करण्यात आली आहे. यात आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांसह उर्वरित कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.इतर तक्रारींचा आकडा ५१७झाडे पडणे, आग याचबरोबर हेल्पलाईनवर येणाऱ्या तक्रारीत कावळा, मांजर कुत्रा अडकल्याच्या, रस्त्यावर आॅईल सांडल्याच्या ५१७ अन्य तक्रारीही होत्या. यंदाच्या जूनमध्ये तक्रारींत वाढगेल्यावर्षीपेक्षा यंदाच्या जूनमध्ये तक्रारींचे प्रमाण २१६ ने वाढले. मागील वर्षापेक्षा यंदा ९० झाडे जास्त पडली, तर पाणी साठण्याच्या घटनांचे प्रमाणही ३६ ने वाढले. आगीचे प्रमाण सहाने वाढले आहे. तसेच, इतर तक्रारींचे प्रमाणही ५१ ने वाढले आहे.पूरपरिस्थिती किंवा आपत्तीची स्थिती उद्भवल्यास नागरिकांच्या मदतीसाठी पालिकेने २४ तास १८००२२२१०८ या क्रमांकाची हेल्पलाईन सुरू केली आहे.- संतोष कदम, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, ठामपा.