शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाविरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 01:30 IST

सोशल मीडियावरही प्रचार केल्याचा आरोप

मीरा रोड : आचारसंहिता भंगाची पहिली तक्रार भाजपाविरोधात निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर भूमिपूजन करून सोशल मीडियावर प्रचार-प्रसार केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी या तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गुप्ता यांनी निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली आहे. १० मार्च रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू झाली होती. त्यानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भार्इंदर पश्चिमेच्या रत्नप्रिया कॉम्पलेक्स येथे भाजपा आमदार नरेंद्र मेहता, सभापती डॉ. सुशील अग्रवाल, सुरेश खंडेलवाल आणि नगरसेविका वर्षा भानुशाली यांनी गटाराच्या कामाचे भूमिपूजन केले. आपल्यासमोरच हा कार्यक्रम झाल्याचे गुप्ता यांनी म्हटले आहे.याशिवाय, नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांनी पालिका शाळेच्या डिजिटल क्लासचे उद्घाटन आणि भानुशाली यांनी एका चौकाचे उद्घाटन आ. मेहता व अन्य नगरसेवकांसह केल्याची पोस्ट छायाचित्रांसह फेसबुकवर टाकली होती. पालिका अधिकाऱ्यांनी कारवाई न केल्याने आयोगाकडे लेखी तक्रार करावी लागल्याचे गुप्ता म्हणाले. या तक्रारीनंतर आयुक्त बालाजी खतगावकर यांनी तक्रारदारासह अधिकाऱ्यांची सुनावणी घेतली.कळवा, मुंब्य्रात कोनशिला जैसे थेमुंब्रा : सतराव्या लोकसभेसाठी सुरू असलेल्या आचारसंहितेचा कळवा, मुंब्य्रात अनेक ठिकाणी भंग होत आहे. ११ एप्रिल ते १९ मे दरम्यान सात टप्प्यांमध्ये देशात सतराव्या लोकसभेसाठी मतदान होणार आहे. याची घोषणा निवडणूक आयोगाने तीन दिवसांपूर्वी रविवारी केली. त्याचक्षणी देशात आचारसंहिता सुरू झाली.आदर्श आचारसंहितेनुसार सार्वजनिक ठिकाणी पक्ष, त्यांची चिन्हे, नेत्यांची नावे, त्यांनी केलेल्या कामांचे जाहीर प्रदर्शन करण्यावर बंदी आहे. परंतु कळवा, मुंब्य्रात अनेक ठिकाणी राजकीय पक्षांच्या नेत्यांची नावे ठळकपणे मतदारांच्या नजरेस पडत आहेत.या भागात अनेक प्रकल्पांना मूर्त स्वरूप देण्यात आले. त्यांचे लोकार्पण करताना नेत्यांच्या नावांच्या कोनशिला बसवण्यात आल्या होत्या. मात्र, आचारसंहिता सुरू असतानाही अनेक कोनशिलांवर आच्छादन टाकलेले नाही. हा आचारसंहितेचा भंग असून निवडणूक यंत्रणेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.रविवारी सायंकाळी आचारसंहिता लागू होण्याआधी आम्ही उद्घाटन व भूमिपूजन केले. फेसबुकवर कर्मचाऱ्यांनी दुसºया दिवशी पोस्ट टाकल्या. आम्ही जबाबदार लोकप्रतिनिधी असून आचारसंहितेचा भंग केलेला नाही. तक्रारीत तथ्य नाही.- ध्रुवकिशोर पाटील, नगरसेवक

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपा