शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मुलाच्या पालकांना नुकसानभरपाई द्या, उच्च न्यायालयाचे ठाणे पालिकेला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 03:42 IST

लवादाने टीएमटीला मुलाच्या पालकांना २२ लाख रुपये अर्ज केल्याच्या दिवसापासून वार्षिक ८ टक्के व्याजाने देण्याचा आदेश दिला.

मुंबई : बस अपघातात मृत्यू पावलेल्या किशोरवयीन मुलाच्या पालकांना नुकसानभरपाई देण्याचा वाहन अपघात लवादाचा निर्णय योग्य असल्याचे म्हणत उच्च न्यायालयाने त्या पालकांना अतिरिक्त नुकसान भरपाई देण्याचा आदेश ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाला (टीएमटी) दिले.लवादाने टीएमटीला मुलाच्या पालकांना २२ लाख रुपये अर्ज केल्याच्या दिवसापासून वार्षिक ८ टक्के व्याजाने देण्याचा आदेश दिला. त्याला टीएमटीच्या व्यवस्थापकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे या अपिलावरील निर्णय मंगळवारी दिला.५ डिसेंबर २०१४ रोजी दहावीत शिकत असलेला ध्रुव ठक्कर हा मुलुंड पूर्वेला असलेल्या ज्ञान सरिता उच्च माध्यमिक शाळेसमोरून टीएमटीची बस पकडत होता. तेवढ्यात वाहकाने बसची बेल वाजवली. त्यांनतर बस सुरू झाली आणि ध्रुव बसच्या दारातून खाली पडून आला. त्याचा पाय चिरडला गेला. दोन रुग्णालयांतून त्याला हलविण्यात आले आणि १३ फेब्रुवारी २०१५ रोजी मृत्यू झाला.टीएमटीने लवादाच्या निर्णयाला आव्हान देत म्हटले की, बस थांबण्यापूर्वीच ध्रुव बसमध्ये चढला. तसेच पालकांनी दिलेले बिल अवाजवी असल्याने नुकसानभरपाई मिळणार नाही, असे टीएमटीच्या वकिलांनी सांगितले. तर ध्रुवच्या पालकांच्यावतीने निखिल मेहता यांनी सांगितले की, वाहकाने मान्य केले आहे की, ध्रुव बसमध्ये चढत असल्याचे त्याने पाहिले नाही तर चालकाने उलट तपासणीत मान्य केले की त्याने अपघात पहिला नाही. रुग्णालयांची बिले लवादापुढे सादर केली. उलट लवादाने त्यात अतिरिक्त नुकसानभरपाई दिली पाहिजे.वार्षिक ८ टक्के व्याजअर्जदाराने व प्रतिवाद्याने सादर केलेली सर्व कागदपत्रे व तोंडी पुरावे विचारात घेत लवादाने स्पष्ट केले की, ध्रुव बस चढत असताना वाहकाने पाहिले नाही आणि बसची बेल वाजवल्याने चालकाने बस पुढे नेली. त्या दोघांच्या दुर्लक्षामुळे ध्रुवला अपघात झाला, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. लवादाने योग्य निर्णय दिल्याचे म्हणत उच्च न्यायालयाने लवादाने दिलेल्या नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ केली. उच्च न्यायालयाने टीएमटीला २६ लाख रुपये नुकसान भरपाई अर्ज दाखल केल्याच्या दिवसापासून वार्षिक ८ टक्के व्याजाने देण्याचा आदेश दिला.

टॅग्स :thaneठाणे