शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पालिकेची मॅरेथॉन रद्द करण्याची सामाजिक संघटनांची मागणी, पूरग्रस्तांना मदत करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 23:46 IST

मीरा- भार्इंदर महापालिकेची १८ आॅगस्ट रोजी होणारी महापौर मॅरेथॉन स्पर्धा रद्द करून त्यासाठीचा खर्च पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये वर्ग करण्याची मागणी काँग्रेससह विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी चालवली आहे.

मीरा रोड : मीरा- भार्इंदर महापालिकेची १८ आॅगस्ट रोजी होणारी महापौर मॅरेथॉन स्पर्धा रद्द करून त्यासाठीचा खर्च पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये वर्ग करण्याची मागणी काँग्रेससह विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी चालवली आहे. काँग्रेसचे नगरसेवक आपले एक महिन्याचे मानधन पूरग्रस्तांसाठी देणार आहेत.महापालिकेची मॅरेथॉन स्पर्धा विविध कारणांनी वादग्रस्त ठरली आहे. राजकीय आणि आर्थिक गैरप्रकार तसेच नाहक उधळपट्टी अशा स्वरूपाच्या आरोपांच्या फैरी पालिका आणि सत्ताधाऱ्यांवर झडत आहेत. त्यातच काँग्रेसचे नगरसेवक अनिल सावंत, गटनेते जुबेर इनामदार, नगरसेवक राजीव मेहरा, नगरसेविका गीता परदेशी, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रमोद सावंत, प्रवक्ते प्रकाश नागणे आदींनी मंगळवारी पालिका आयुक्तांच्या नावे या बाबतचे निवेदन दिले.पश्चिम महाराष्ट्र, कोकण, ठाणे, खानदेश आदी विविध भागात पुरामुळे अनेक नागरिकांना जीव गमवावे लागले आहेत. लाखो नागरिकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. राज्यात दुखाचे वातावरण असताना मॅरेथॉनचे पालिकेने आयोजन करणे योग्य नसल्याने ती रद्द करून त्याचा निधी मुख्यमंत्र्यांच्या पूरग्रस्त सहायता निधीत देण्यात यावेत अशी मागणी केली आहे. उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे आणि सहायक आयुक्त संजय दोंदे यांना काँग्रेस शिष्टमंडळाने निवेदन दिले. जनता दल (से.) चे मिलन म्हात्रे, गोवर्धन देशमुख, संतोष पेंडुरकर, विश्वनाथ तायडे, वंचित बहुजन आघाडी, प्रदीप जंगम, कृष्णा गुप्ता, गणेश फडके, भावना तिवारी, मनसेचे शहर संघटक हेमंत सावंत व प्रमोद देठे, माजी नगरसेवक रोहित सुवर्णा तसेच सामाजिक कार्यकर्त्या सरिता नाईक आदींनीही मॅरेथॉन रद्द करुन निधी पूरग्रस्तांना देण्याची मागणी केली.स्पर्धा बेकायदाही स्पर्धा बेकायदा असल्याचे महाराष्ट्र राज्य अ‍ॅथलेटिक असोसिएशनने स्पष्ट केले आहे.जिल्हा अ‍ॅथलेटिक असोसिएशनची कोणतीच परवानगी घेतलेली नाही. सहायक आयुक्त संजय दोंदे यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही.

टॅग्स :Marathonमॅरेथॉन