शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

मनोरुग्ण महिलेचा लोकलमध्ये गोंधळ, प्रवासी जखमी; हेल्पलाइन ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 12:50 IST

मेस्त्री यांनी बुधवारी सकाळी सफाळे येथील आपल्या कार्यालयात जाण्यासाठी बोईसर स्थानकातून १० वाजून २८ मिनिटांची डहाणू-विरार लोकल पकडली.  महिलांच्या डब्यामध्ये एका मनोरुग्ण महिलेने उमरोळी स्थानकापासून गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

पालघर : डहाणू ते विरारदरम्यान प्रवास करताना महिला प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली असून, डहाणूवरून विरारकडे जाणाऱ्या १० वाजून ५ मिनिटांनी सुटणाऱ्या लोकलच्या महिलांच्या डब्यात एका मनोरुग्ण महिलेमुळे झालेल्या गोंधळात ३६ वर्षीय महिला पत्रकार विभूती मेस्त्री जखमी झाल्या आहेत. पालघर पोलिसांनी त्यांच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना सोडले. मेस्त्री यांनी बुधवारी सकाळी सफाळे येथील आपल्या कार्यालयात जाण्यासाठी बोईसर स्थानकातून १० वाजून २८ मिनिटांची डहाणू-विरार लोकल पकडली.  महिलांच्या डब्यामध्ये एका मनोरुग्ण महिलेने उमरोळी स्थानकापासून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ती महिला प्रवाशांच्या अंगावर धावून जाऊ लागली. यावेळी काही महिलांना तिने मारहाण करीत ढकलण्याचा प्रयत्न केल्याचे विभूती यांनी ‘लोकमत’ला सांगितले.या गोंधळामुळे डब्यातील महिलांमध्ये घबराटीचे व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी विभूतीसह अनेक महिलांनी प्रसंगावधान राखून रेल्वे पोलिसांच्या १५१२ व १३९ या दोन्ही हेल्पलाइनवर तत्काळ मदतीसाठी अनेक वेळा संपर्क साधूनही संपर्क झाला नाही. यामुळे पश्चिम रेल्वेची ही सेवा फक्त नावापुरती उपलब्ध करण्यात आल्याचे दिसून आले. विरार ते डहाणूदरम्यान स्थानकात सीसीटीव्ही लावण्याची मागणी होत केली जात आहे.

तक्रार दाखल नाही-  लोकलने पालघर स्थानकात प्रवेश केल्यावर विभूती हिने दरवाजात येऊन रेल्वे पोलिसांची मदत मिळविण्याचा प्रयत्न केला. -  या प्रयत्नांत लोकलच्या डब्यातील गोंधळामुळे त्या धावत्या लोकलमधून फलाटावर पडून जखमी झाल्या. -  जखमी महिलेला रेल्वे महिला पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात नेले. यासंदर्भात कुठलीही तक्रार दाखल करण्यात आली नसल्याची माहिती पालघर रेल्वे पोलीस ठाण्याचे सपोनि पी.डी. देवकाते यांनी सांगून त्या मनोरुग्ण महिलेला स्टेशनच्या बाहेर सोडल्याचे सांगितले. 

टॅग्स :localलोकलPoliceपोलिसpassengerप्रवासी