शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
2
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
3
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
4
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
5
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
6
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
7
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
8
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
9
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
10
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
11
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
12
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
13
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
14
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
15
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
16
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
17
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
18
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
19
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
20
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS

गॅस सिलिंडर स्फोटाच्या दुर्घटना रोखण्यासाठी आयुक्तांनी नेमली समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 00:34 IST

सिलिंडर स्फोटाच्या मालिकेप्रकरणी महापालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ६ जणांची समिती नेमली आहे. सात दिवसांत या समितीला अहवाल सादर करायचा आहे.

मीरा राेड :  मीरारोडच्या शांती गार्डनजवळील मोकळ्या भूखंडात गॅस सिलिंडर भरून असलेल्या ट्रकमध्ये ८ फेब्रुवारीला मध्यरात्री २ च्या सुमारास आग लागून झालेल्या सिलिंडर स्फोटाच्या मालिकेप्रकरणी महापालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ६ जणांची समिती नेमली आहे. सात दिवसांत या समितीला अहवाल सादर करायचा आहे.शांती गार्डनजवळील मोकळ्या मैदानात गॅस सिलिंडरने भरलेले दोन ट्रक उभे होते. त्यातील एका ट्रकला आग लागून लागोपाठ ६ सिलिंडरचा स्फोट होऊन मीरारोड हादरले. घटनास्थळापासून रहिवासी इमारती लांब असल्याने मोठा अनर्थ टळला. या ठिकाणी नियमितपणे गॅस सिलिंडरचे ट्रक उभे केले जातात. अग्निशमन दलापासून आवश्यक परवानग्या न घेता हे सर्व बिनबोभाट सुरू असल्याने टीकेची झोड उठली.काशीमीरा पोलिसांनी याप्रकरणी ट्रकचालकास अटक केली असून, आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई केली, तर दुसरीकडे पालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी या दुर्घटनेची चौकशी, तसेच अशा दुर्घटना घडू नये यासाठी अतिरिक्त आयुक्त दिलीप ढोले यांच्या अध्यक्षतेखाली ६ जणांची समिती नेमली आहे.कारणे शोधून उपाययोजनाही सुचविणारसमितीने सिलिंडर स्फोटाचे कारण शोधायचे आहे. वितरक व जमीन मालक कोण?, वाहनाचे मालक कोण?, सिलिंडर वाहनात भरून ते उभे ठेवायची परवानगी होती का?, आवश्यक दक्षता? आदी मुद्द्यांवर तपास करायचा आहे. समितीने शहरात भविष्यात असे अपघात घडू नये, म्हणून अग्निशमन विभाग व पालिकेने काय दक्षता? घेणे अपेक्षित आहे, याचे मुद्दे सुचवायचे आहेत. रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्रेते तसेच फुगे विक्रेते यांना एलपीजी सिलिंडर कसे उपलब्ध होतात? प्रभागात अशा किती मोकळ्या जागा आहेत जेथे अनधिकृत व्यवसाय सुरू आहेत व वाहने उभी केली जातात याचाही अहवाल सादर करायचा आहे.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक