शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

आयुक्त म्हणतात, सारा खेळ कल्पनेचा...

By admin | Updated: December 24, 2016 03:09 IST

भविष्यात कळव्याची खाडी राहील की नाही, ही भीती माझ्या मनात होती. तीच मी महासभेत व्यक्त केली. परंतु, ते माझ्या मनातील

ठाणे : भविष्यात कळव्याची खाडी राहील की नाही, ही भीती माझ्या मनात होती. तीच मी महासभेत व्यक्त केली. परंतु, ते माझ्या मनातील काल्पनिक विचार होते. त्यामुळे एवढ्या गोष्टी घडतील, हे मला माहीत नव्हते, असे उद्गार महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत काढले. आयुक्तांनी व्यक्त केलेले विचार जरी काल्पनिक असले, तरी त्या अनुषंगाने महासभेने केलेला ठराव काल्पनिक नाही, असा चिमटा महापौर संजय मोरे यांनी काढला. पारसिक चौपाटी विकसित करण्याच्या ठामपाच्या योजनेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी कळवा खाडीकिनाराही सुशोभित करण्याचा आपला मानस होता का, असा सवाल केला असता आयुक्तांनी वरील उद्गार काढले. ते म्हणाले की, येथील पाइपलाइनलगत असलेल्या सुमारे २४० अतिक्रमणांवर कारवाई करणार, असे आम्ही सांगितले होते. त्यानुसार, त्याची जाहिरात प्रसिद्ध केली होती. विशेष म्हणजे या रहिवाशांचा सर्व्हे करून नगरसेवक आणि आमदारांशी चर्चा करून त्यांचे पुनर्वसन बीएसयूपीच्या घरात केले जाणार होते. ही जागा पालिकेची असल्याने पालिका त्यांचे पुनर्वसन करणार होती. परंतु जानकीनगर, महात्मा फुलेनगर आदींसह कळवा खाडीकिनारी असलेली बांधकामे ही महसूल विभागाच्या जमिनीवर असल्याने त्यांच्याशी चर्चा करून पुढील कारवाई होणार आहे. पारसिक रेतीबंदरची जागा ज्या पद्धतीने महसूल विभागाच्या मदतीने पालिकेने अतिक्रमणमुक्त केली होती. त्यानुसारच, महसूल विभागाला पालिका मदत करणार होती. त्याकरिता, कायदेशीर प्रक्रिया महसूललाच पूर्ण करायची आहे. आयुक्तांनी महासभेत व्यक्त केलेल्या विचारांमुळे विधान परिषदेच्या सभापतींचे स्थगिती आदेश असतानाही महासभेने कारवाई सुरू ठेवण्याबाबत आदेशांच्या विपरित ठराव केला. (प्रतिनिधी)