शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

आयुक्त सौरभ राव यांनी हाती घेतला झाडू, सफाईचा संदेश देत नागरिकांशी साधला संवाद

By अजित मांडके | Updated: April 6, 2024 15:34 IST

भारतीय नववर्ष गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: नौपाडा परिसरात शनिवारी  महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ६.३० वाजल्यापासून स्वच्छता मोहिमेस सुरूवात झाली. श्रीकौपिनेश्वर मंदिर, भाजी मंडई परिसर, जांभळीनाका परिसर, स्टेशन रोड तसेच तलावपाळी परिसरातील साफसफाई करुन परिसर पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आला. यावेळी राव यांनी स्वतः हातात झाडू घेवून अंतर्गत रस्त्यांची, गल्ल्यांची साफसफाई केली. भारतीय नववर्ष गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

या मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांसमवेत अतिरिक्त आयुक्त  संदीप माळवी, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपूरे, नौपाडा परिमंडळचे उपायुक्त् शंकर पाटोळे, उपायुक्त अनघा कदम, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केस्वावानी, सहायक आयुक्त सोपान भाईक, वैदकीय आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले.राव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मोहिमेत त्यांनी स्वत: हातात झाडू घेवून अंतर्गत रस्त्यांची, गल्ल्यांची साफसफाई केली. यावेळी कौपिनेश्वर मंदिर ते मराठी ग्रंथ संग्रहालय परिसराची पाहणी केली. या परिसरातील दुकानांच्या पाठी असलेल्या छोटया गल्ल्यांची सफाई केली. तसेच मुख्य रस्त्यांबरोबर अंतर्गत गल्ल्यांही नियमित स्वच्छ करण्याचे आदेश संबंधितांना दिले. तसेच तलावपाळी येथील सॅटिस पुलाच्या खाली असलेले राडारोडा त्वरीत उचलण्याचे निर्देशही आयुक्तांनी यावेळी दिले. 

नागरिकांशी साधला संवादतलावपाळी परिसरात सकाळी फेरफटका मारण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी नियमितपणे फूटपाथची सफाई होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मात्र, तलावपाळी परिसरात काही नागरिक हे कबुतरांना दाणे खायला घालतात, त्यामुळे परिसर अस्वच्छ होतोच, परंतु कबुतरांमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होवू शकतो. त्याचप्रमाणे रस्त्यांवर पाळीव प्राणी घेवून येणारे नागरिक हे प्राण्यांची विष्ठा उचलत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी आयुक्तांकडे केल्या. यावर आयुक्तांनी याबाबत निश्चितच उपाययोजना करण्यात येतील असे सांगितले. तसेच, ज्या ठिकाणी कबुतरांना दाणे घातले जातात त्या परिसरात फलक लावण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. 

ॲम्फीथिएटरची केली पाहणीतलावपाळी परिसरात सेंट जॉन शाळेच्यासमोरील भागात महापालिकेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या ॲम्फीथिएटरची पाहणी केली. यावेळी येथील नागरिकांशी नियमित स्वच्छता होते का याबाबत विचारणा करीत राव यांनी त्यांच्याशी संवाद साधला. स्वच्छतेबाबत नागरिकांनी महापालिकेचे कौतुक केले. परंतु रस्त्यावर फेरीवाले व त्यांचे कुटुंबीय झोपत असून सकाळी फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत असल्याचे सांगत यावर महापालिकेच्या माध्यमातून कारवाई झाली पाहिजे असे मत व्यक्त केले. या बाबीची दखल घेवून रस्त्यावर झोपणाऱ्या नागरिकांना निवारा शेडमध्ये पाठविता येईल का याबाबतची चाचपणी करुन फूटपाथ नागरिकांसाठी मोकळे राहतील या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही संबधितांना दिल्या.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका