शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील अधिकाऱ्यांचे पोलीस आयुक्तांनी केले खांदेपालट: चार अधिकाऱ्यांना वरिष्ठ निरीक्षकाची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 01:06 IST

आता वर्तकनगर येथे वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे सदाशिव निकम यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. निकम यांच्यासह चार अधिकाºयांना आता वरिष्ठ निरीक्षकपदाची जबाबदारी सोपविली आहे.

ठळक मुद्देसदाशिव निकम यांना वर्तकनगरची जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: महिनाभरापूर्वीच डान्स बार प्रकरणात प्रथम दर्शनी दोषी आढळल्यामुळे तसेच कर्तव्यात कसूरी केल्यामुळे नौपाडा आणि वर्तकनगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर पोलीस आयुक्तांनी तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर आता नौपाडा वगळता वर्तकनगर येथे वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे सदाशिव निकम यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. निकम यांच्यासह चार अधिकाºयांना आता वरिष्ठ निरीक्षकपदाची जबाबदारी सोपविली आहे.ठाण्याचे सह पोलीस आयुक्त डॉ. सुरेश मेकला यांनी गुरुवारी काढलेल्या आदेशानुसार विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्र यांना हिललाईन पोलीस ठाण्यात संधी दिली आहे. तर वर्तकनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांना पुन्हा प्रशासनाची जबाबदारी सोपविली असून वर्तकनगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदाची धूरा निकम यांच्याकडे सोपविली आहे. गुन्हे शाखेचे चेतन काकडे यांना भिवंडी शहर पोलीस ठाण्यात तर राबोडी पोलीस ठाण्याचे पंढरीनाथ भालेराव यांना विष्णुनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.* घाटेकर यांना औटघटकेची संधी-वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना डान्स बार प्रकरणावरुन निलंबित केल्यानंतर त्याच पोलीस ठाण्याचे प्रशासन सांभाळणारे निरीक्षक संतोष घाटेकर यांच्याकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाची संधी देण्यात आली होती. परंतू, आता त्याठिकाणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या निकम यांची नियुक्ती केल्यामुळे घाटेकर यांचा कार्यकाळ औटघटकेचा ठरला आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीTransferबदली