शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

महाजनवाडी भागातील ओढ्याचे अखेर रुंदीकरण करण्याचे आयुक्तांचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 13:12 IST

MiraRoad News : मोकळ्या जागेत व नैसर्गिक ओढ्यात भराव होऊन बेकायदा बांधकामे झाली. पालिकेने देखील ओढ्याचा नाला करून टाकला.

मीरारोड - संजय गांधी राष्ट्रीय उद्याना लगत आदिवासी व सरकारी जागेत वसलेल्या वस्ती मधील नैसर्गिक ओढ्यात झालेल्या अतिक्रमण मुळे दरवर्षी पावसाळ्यात लोकांच्या घरात पाणी शिरून जीवित व वित्त हानी होण्याच्या घटना घडतात. 'वॉक विथ कमिश्नर' उपक्रमा अंतर्गत या भागाची पाहणी केल्यानंतर येथील नाल्याची रुंदी वाढवण्यासह बाधितांचे पुनवर्सन करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. 

काशीमीरा भागातील महाजन वाडी परिसरातील सरकारी व आदिवासी जमिनींवर मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे महापालिका, महसूल व स्थानिक नेते - लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने होत आली आहेत. सदर बेकायदा बांधकामांवर कारवाई ऐवजी त्यांना संरक्षण देण्यासह सर्व सोयी सुविधा पालिकेने नगरसेवकांच्या संगनमताने दिल्या आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून फोफावलेल्या या बेकायदा बांधकामांचा परिसर इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये येतो. 

जंगलातून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा लोंढा वाहून येतो. पूर्वी या ठिकाणी नैसर्गिक ओढा होता . तसेच जंगला लगतचा हा परिसर निसर्गरम्य मोकळा होता. परंतु साधारण २००० सालापासून स्थानिक भूमाफिया, नेते मंडळींनी महापालिकेच्या व महसूल विभागाच्या संगनमताने बेकायदेशीर बांधकामे सरकारी व आदिवासी जागेत सुरु केली. हळूहळू बेकायदा बांधकामे वाढ जाऊन येथे प्रचंड मोठी झोपडपट्टी तयार झाली आहे. महाविष्णू मंदिर मागील सरकारी तलाव सुद्धा माफियांनी बुजवण्यास घेतला आहे. 

मोकळ्या जागेत व नैसर्गिक ओढ्यात भराव होऊन बेकायदा बांधकामे झाली. पालिकेने देखील ओढ्याचा नाला करून टाकला. सदर नाला अरुंद झाला आहे. त्यामुळेच पावसाळ्यात येणाऱ्या प्रचंड पाण्याच्या प्रवाहात येथील काही बांधकामे पडून अनेकांचे बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. लोकांच्या घरात पाणी शिरून त्यांचे नुकसान होणे, वाहने वाहून जाणे आदी प्रकार तर दरवर्षीचे झाले आहेत. 

पावसाळा दरम्यान दरवर्षी महाजनवाडी, बापा सीताराम, गावदेवी, महाविष्णू मंदिर या परिसरात पाणी साचून निर्माण होणाऱ्या समस्ये बाबत बापा सीताराम चाळ येथील पालिका नाल्याची आयुक्त दिलीप ढोले यांनी त्यांच्या 'वॉक विथ कमिश्नर' उपक्रमा अंतर्गत या भागाची पाहणी केली. नाल्यात कचरा साचला होता. 

यावेळी अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे व विजयकुमार म्हसाळ, उपायुक्त अजित मुठे, मारुती गायकवाड व संजय शिंदे, शहर अभियंता शिवाजी बारकुंड, कार्यकारी अभियंता  सुरेश वाकोडे व दीपक खांबीत, सहाय्यक आयुक्त सचिन बच्छाव, अतिक्रमण विभाग नरेंद्र चव्हाण, प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत, उद्यान अधिक्षक नागेश इरकर, स्वच्छता अधिक्षक राजकुमार कांबळे, जनसंपर्क अधिकारी राजकुमार घरत व कर्मचारी उपस्थित होते.

मुख्यतः सदर नाला हा अरुंद असल्याने सर्वत्र पाणी भरते. याकरिता सदर नाला रुंदीकरणासह नव्याने नाला बांधण्यासाठी सर्वेक्षण करावे. तसेच नाल्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या घरांचे सर्वेक्षण करून त्यांना स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आयुक्त यांनी कार्यकारी अभियंता दिपक खांबित यांना दिले असल्याचे पालिकेच्या जनसंपर्क विभागाने कळवले आहे. 

 

टॅग्स :mira roadमीरा रोड