शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोत्कृष्ट तपास करणार्‍या पोलीस निरीक्षकांचा पोलीस आयुक्त मधुकर पांडेनी केला सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 19:33 IST

सर्वोत्कृष्ट तपास करणार्‍या पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्तांकडून गौरविण्यात येते.

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- पोलीस आयुक्तालयात दर महिन्यात सर्वोत्कृष्ट तपास करणार्‍या पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्तांकडून गौरविण्यात येते. मे महिन्यात ३ गुन्ह्यांची उकल केल्याप्रकरणी ३ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा सत्कार केला आहे. पेल्हारच्या सायरा बानूच्या हत्याप्रकरणाचा तपास केल्याबद्दल पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना गौरविण्यात आले. जबरी चोरी आणि वाहन चोरी असे एकूण ११ गुन्ह्यांची उकल केली म्हणून गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांना तर २० लाखांचे अंमली पदार्थ जप्त केल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक अविराज कुऱ्हाडे यांना सर्वोत्कृष्ट तपासाबद्दल गौरविण्यात आले.

पेल्हार येथील अनोळखी महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडून आरोपीला ७२ तासांत दिल्ली येथून अटक करून या गुन्ह्याची उकल पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या पथकाने केली होती. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला घटनास्थळी निरोध आणि स्प्रे मिळाला होता. धानिवबाग परिसरातील एका मेडिकलमधून आरोपीने या वस्तू घेतल्याचे सीसीटीव्हीमधून निष्पन्न झाले. या मयत महिलेची ओळख पटविण्यासाठी मतदार याद्या पोलिसांनी प्राप्त केल्या. महिलेच्या पेहरावावरून मुस्लिम वाटत असल्याने मुस्लिम महिलांच्या नावाची शॉर्टलिस्ट तयार केली. त्यानंतर प्रत्येक घरे शोधण्यास सुरुवात केली. धानिवबाग तलाव येथे राहणाऱ्या जियाउल्लाह शाह यांची पत्नी ३ दिवसांपासून बेपत्ता असल्याने पोलीस ठाण्यात गेल्याची माहिती मिळाली. त्यांना भेटून पोलिसांनी फोटो दाखविल्यावर त्यांची पत्नी सायरा (३४) हिचा असल्याचे ओळखले. पोलिसांनी मेडीकलमधील सीसीटीव्ही फुटेज दाखविल्यावर भाचा नजाबुद्दीन सम्मी (२१) हा असल्याचे सांगून दोघांचे दोन वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना दिली. गुन्हे प्रकटीकरण पथकाची टीम दिल्लीला गेली. तो एका बेकरीमध्ये काम करत असल्याची माहिती मिळाल्यावर रात्रभरात ९० ते १०० बेकऱ्या तपासून आरोपीला ताब्यात घेतले. त्याने महिलेसोबत अनैतिक संबंधातून वाद झाल्याने २७ मे रोजी नालासोपाऱ्यात येऊन चाकूने गळा चिरून व छातीत खुपसून हत्या करून पळून गेला होता.

गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या टीममधील पोलिसांनी जबरी चोरी व दुचाकी चोरणाऱ्या आरिफ शेख या आरोपीला अटक केली होती. या आरोपीकडून २ जबरी चोरी आणि ९ वाहन चोरी असे एकूण ११ गुन्ह्यांची उकल केल्याने याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांना सर्वोत्कृष्ट तपासाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर १५ मे रोजी दुपारी ठाणे घोडबंदर रोडवर चेनागाव येथील हॉटेल द्वारकाच्या समोर आरोपी शोएब मेनन (३३) आणि निकोलस टायटस (३९) यांच्याकडे सुमारे २० लाख रुपये किंमतीचे १ हजार ग्रॅम एम डी अंमली पदार्थ मिळून आला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करून गुन्हे शाखेने ३६ लाख ७० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याने याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक अविराज कुऱ्हाडे यांना सर्वोत्कृष्ट तपासाबद्दल गौरविण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी