शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदरमधील दुकाने, व्यवसाय आता रोज खुले ठेवण्यास आयुक्तांनी दिली परवानगी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 13:58 IST

नोकरी करणारे व रोज कमावून खाणाऱ्या गरिबांची आर्थिक स्थिती खूपच बिकट झालेली आहे.

मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये हॉटस्पॉट वगळता महापालिकेने सम - विषम पद्धत  आता बंद करून सोमवार पासून दुकाने - व्यवसाय नियमित सुरु करण्यास परवानगी दिली आहे . आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी तसे लेखी आदेश शनिवारी जारी केले . आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन सह शहरातील व्यापारी वर्ग आदींनी याची मागणी केली होती. दुकाने नियमित सुरु होणार असली तरी नागरिक व व्यापाऱ्यांनी देखील जबाबदारीने मास्कचा वापर आणि सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे . 

मीरा भाईंदर मध्ये 11 जुलै पासून दुकानांना सम विषम पद्धतीने खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली . कोरोनाच्या संसर्गाचामुळे मार्च अखेरीस पासून भाजीपाला , दूध , किराणा, औषधे आदी अत्यावश्यक सेवा वगळून शहरातील व्यवसाय , दुकाने , बाजार आदी सर्व तीन महिन्यां पेक्षा जास्त काळ बंद आहे . शहरातील स्टील उद्योग तसेच अनेक लहान मोठे कारखाने बंद होते . 

यामुळे सगळ्यांचेच मोठे आर्थिक नुकसान झालेले असून लहान - सहान नोकरी करणारे व रोज कमावून खाणाऱ्या गरिबांची आर्थिक स्थिती खूपच बिकट झालेली आहे. कोरोनाची लागण सुरु होऊन चार महिने उलटले असून आता शहरातील कोरोना रुग्णांची संख्या रोज शंभरच्या आसपास जात आहे . रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे . पालिकेने घरोघरी सर्वेक्षण चालवले आहे . शिवाय झटपट अशी अँटीजेन चाचणी सुरु केली गेली आहे. 

कोरोनाचा संसर्ग पसरू नये व त्याची लागण होऊ नये यासाठी आवश्यक सर्व खबरदारी घेतानाच शहरातील नागरिकांची आर्थिक घडी पुन्हा बसवण्याची नितांत आवश्यकता आहे . नागरिकांच्या हाताला काम नाही मिळाल्यास अनेकांवर उपासमारीची पाळी येईल आणि यातून भयंकर असे सामाजिक प्रश्न उभे राहतील  अशी भूमिका आमदार प्रताप सरनाईक व आमदार गीता जैन यांनी मांडली . 

आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी सर्व बाबींचा सारासार विचार करून मीरा भाईंदर मधील सर्व व्यवहार पूर्व पदावर आणण्यासाठी सुधारित आदेश काढून सम विषम पद्धत बंद करावी . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मिशन बिगिन अगेन धोरणाचे पालन केले जावे . गर्दी व संसर्गाची धास्ती आहे आणि शासनाने देखील निर्बंध कायम ठेवले आहेत अश्या आस्थापना वगळून शहरातील सर्व दुकाने - व्यवसाय नियमितपणे सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी दोन्ही आमदारांनी केली होती . या  शहरातील व्यापारी वर्ग आदींनी देखील सम विषम पद्धत बंद करा अशी मागणी चालवली होती . 

आयुक्तांनी 15 ऑगस्ट रोजी आदेश काढून सोमवार 17 ऑगस्ट पासून  सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळात सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे . परंतु कोरोना हॉटस्पॉट मधील  राहतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे . या मुळे आता सर्व दुकानदारांना सरसकट दुकाने सुरु ठेवता येणार आहेत . 

शासन, महापालिका कोरोना संसर्ग रोखण्यासह रुग्णांना बरे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत . बहुतांश नागरिक देखील सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे , गर्दी न करणे , सोशल डिस्टंसिंग पाळणे आदी जबाबदाऱ्या घेत आहेत . पण जे बेजबाबदार लोक निर्देश पळत नाहीत त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई देखील करणे आवश्यक आहे असे सरनाईक म्हणाले .

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMira Bhayanderमीरा-भाईंदर