ठाणे : लग्नाचे अमिष दाखवून घराजवळच्याच एका २३ वर्षीय कॉलेज विद्यार्थीनीवर गेल्या तीन वर्षापासून लैंगिक अत्याचार करणा-या राकेश सिंग (२९) याच्याविरुद्ध चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तिच्याशी लग्न करण्याऐवजी ऐनवेळी त्याने दुस-याच तरुणीशी गावी जाऊन विवाह केल्यामुळे तिने अखेर त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.राकेश सिंग (रा. सुभाषनगर, ठाणे) याचे त्याच परिसरात राहणाºया एका तरुणीबरोबर चांगली मैत्री होती. याचाच फायदा घेऊन त्याने तिला लग्नाचेही अमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. तो उत्तर भारतीय तर ती दक्षिण भारतीय असल्यामुळे त्याच्या घरातून त्यांच्या लग्नाला तसा विरोधच होता. तरीही तिला आपण लग्न करू, असे आश्वासन देऊन जून २०१३ ते डिसेंबर २०१७ या काळात त्याने तिच्याशी ‘संबंध’ सुरुच ठेवले होते. तो लग्न करील, या आशेवर असतांनाच त्याने अचानक गावी जाऊन आपल्या भागातील अन्य तरुणीशी त्याने लग्न केले. ही माहिती मिळताच या मुलीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने अखेर या प्रकरणी २२ फेब्रुवारी २०१८ रोजी याप्रकरणी त्याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि फसवणुकीचा गुन्हा चितळसर पोलीस ठाण्यात दाखल केला. तो गावी असून याप्रकरणी चौकशी करून त्याला लवकरच अटक केली जाईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
लग्नाचे अमिष दाखवून तीन वर्षांपासून महाविद्यालयीन तरुणीवर ठाण्यात लैंगिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 17:17 IST
लग्नाचे अमिष दाखवून गेल्या मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर दुस-याच तरुणीबरोबर विवाह करणा-या मित्राविरुद्ध महाविद्यालयीन तरुणीने चितळसर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
लग्नाचे अमिष दाखवून तीन वर्षांपासून महाविद्यालयीन तरुणीवर ठाण्यात लैंगिक अत्याचार
ठळक मुद्दे सुभाषनगरामध्ये तरुणीच्या घरातच अत्याचारलग्नाला मुलाच्या कुटूंबियांचा विरोधतीन वर्षांनंतर त्याने केले अन्य तरुणीशी लग्न