शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
6
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
7
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
8
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
9
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
10
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
11
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
12
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
13
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
14
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
15
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
16
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
17
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
18
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
19
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
20
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते

पाळण्यात टाकून मुलींचा ठाणे जि.प.कडून सामूहिक नामकरण सोहळा !

By सुरेश लोखंडे | Updated: March 8, 2020 15:05 IST

नवजात बालकांची वाढ सुदृष्ट होण्यासाठी बालकाचे संगोपन झोळ्यात न होता पाळण्यात होणे गरजेचे असते. ही बाब लक्षात घेऊन आता पाळणा, कांगारू किट आणि बाळाच्या संगोपनासाठी बेबी केअर किटचे वाटप यावेळी करण्यात आले.

ठळक मुद्देनुकत्याच जन्मलेल्या लेकींचा (मुलीं) सामूहिक नामकरण सोहळा म्हणजे बारसे पारंपारिक पध्दतीमुळे बालकांचे संगोपन होत असल्यामुळे त्यांच्या वाढीमुळे विकासाला मर्यादा आरोग्यविषयक समस्या उद्भवत असल्याचा दावा

सुरेश लोखंडे

ठाणे : आदिवासी कुटुंबात नुकत्याच जन्मलेल्या लेकींचा (मुलीं) सामूहिक नामकरण सोहळा म्हणजे बारसे मुरबाडच्या शारदा महाविद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडले. शुक्रवारी रंगलेल्या या सोहळ्यात ठाणेजिल्हा परिषदेच्या (जि.प.) अध्यक्षा दीपाली पाटील, यांनीे बालिकांना पाळण्यात टाकून त्यांचे नामकरण केले. याशिवाय बालिकांना पाळण्याच वाटप करण्यात आले.       जि.प.च्या महिला व बाल विकास विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी महिला व बालकल्याण समिती सभापती सपना भोईर, जि.प. सदस्य उल्हास बांगर, सदस्या झुगरे, पंचायत समिती सदस्य सीमा घरत, जया वाघ, पद्मा पवार, स्नेहा धनगर, विष्णू घुडे, प्रगती गायकर, सरपंच हिराबाई हिलम, राजेंद्र भोईर, जिल्हा कार्यक्र म अधिकारी संतोष भोसले प्रकल्प अधिकारी कल्पना देशमुख,सतीश पोळ,राठोड तसेच अंगणवाडी सेविका आणि बालिकांचे माता पिता मोठ्यासंख्येने उपस्थित होते. नवजात बालकांची वाढ सुदृष्ट होण्यासाठी बालकाचे संगोपन झोळ्यात न होता पाळण्यात होणे गरजेचे असते. ही बाब लक्षात घेऊन आता पाळणा, कांगारू किट आणि बाळाच्या संगोपनासाठी बेबी केअर किटचे वाटप यावेळी करण्यात आले.         जिल्ह्यात विशेषत: शहापूर , मुरबाड तालुक्यातील आदिवासी भागात अनेक कारणांमुळे बाल संगोपन या महत्वपुर्ण बाबीकडे कुटुंबियांकडून पुरेसे लक्ष दिले जात नाही. पारंपारिक पध्दतीमुळे बालकांचे संगोपन होत असल्यामुळे त्यांच्या वाढीमुळे विकासाला मर्यादा येतात. आदिवासी खेड्यांमध्ये दोन खांबाना कापडाची झोळी (झोका) बांधून त्याचा वापर बालकांना झोपवण्यासाठी केला जातो. यामुळे देखील आरोग्यविषयक समस्या उद्भवत असल्याचा दावा जिल्हा परिषदेकडून केला जात आहे. या झोळीमुळे बालकांना श्वास घेण्यास त्रास होतो. तर पुरेशी खेळती हवा उपलब्ध होत नाही. झोळीच्या कापडास आर्द्र हवामानामुळे बुरशी संसर्ग होतो, बालकांच्या हालचालीस मर्यादा येतात . याशिवाय जास्त वेळ झोळीत ठेवल्याने एकंदर बालकांच्या वाढ व विकासाला मर्यादा येत असल्याचे सांगितले जात आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून मुरबाड तालुक्यातील विशेष प्राविण्य मिळवलेल्या मुलींचा चॅम्पियन्स म्हणून गौरव यावेळी करण्यात आला...............फोटो - ०७ठाणे पाळणे

 

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद