शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पाळण्यात टाकून मुलींचा ठाणे जि.प.कडून सामूहिक नामकरण सोहळा !

By सुरेश लोखंडे | Updated: March 8, 2020 15:18 IST

नवजात बालकांची वाढ सुदृष्ट होण्यासाठी बालकाचे संगोपन झोळ्यात न होता पाळण्यात होणे गरजेचे असते. ही बाब लक्षात घेऊन आता पाळणा, कांगारू किट आणि बाळाच्या संगोपनासाठी बेबी केअर किटचे वाटप यावेळी करण्यात आले.

ठळक मुद्देबालिकांना पाळण्याच वाटपबालकाचे संगोपन झोळ्यात न होता पाळण्यात होणे गरजेचेपारंपारिक पध्दतीमुळे बालकांचे संगोपन होत असल्यामुळे त्यांच्या वाढीमुळे विकासाला मर्यादा

सुरेश लोखंडेठाणे : आदिवासी कुटुंबात नुकत्याच जन्मलेल्या लेकींचा (मुलीं) सामूहिक नामकरण सोहळा म्हणजे बारसे मुरबाडच्या शारदा महाविद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडले. रंगलेल्या या सोहळ्यात ठाणेजिल्हा परिषदेच्या (जि.प.) अध्यक्षा दीपाली पाटील, यांनीे बालिकांना पाळण्यात टाकून त्यांचे नामकरण केले. याशिवाय बालिकांना पाळण्याच वाटप करण्यात आले.       जि.प.च्या महिला व बाल विकास विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी महिला व बालकल्याण समिती सभापती सपना भोईर, जि.प. सदस्य उल्हास बांगर, सदस्या झुगरे, पंचायत समिती सदस्य सीमा घरत, जया वाघ, पद्मा पवार, स्नेहा धनगर, विष्णू घुडे, प्रगती गायकर, सरपंच हिराबाई हिलम, राजेंद्र भोईर, जिल्हा कार्यक्र म अधिकारी संतोष भोसले प्रकल्प अधिकारी कल्पना देशमुख,सतीश पोळ,राठोड तसेच अंगणवाडी सेविका आणि बालिकांचे माता पिता मोठ्यासंख्येने उपस्थित होते. नवजात बालकांची वाढ सुदृष्ट होण्यासाठी बालकाचे संगोपन झोळ्यात न होता पाळण्यात होणे गरजेचे असते. ही बाब लक्षात घेऊन आता पाळणा, कांगारू किट आणि बाळाच्या संगोपनासाठी बेबी केअर किटचे वाटप यावेळी करण्यात आले.       जिल्ह्यात विशेषत: शहापूर , मुरबाड तालुक्यातील आदिवासी भागात अनेक कारणांमुळे बाल संगोपन या महत्वपुर्ण बाबीकडे कुटुंबियांकडून पुरेसे लक्ष दिले जात नाही. पारंपारिक पध्दतीमुळे बालकांचे संगोपन होत असल्यामुळे त्यांच्या वाढीमुळे विकासाला मर्यादा येतात. आदिवासी खेड्यांमध्ये दोन खांबाना कापडाची झोळी (झोका) बांधून त्याचा वापर बालकांना झोपवण्यासाठी केला जातो. यामुळे देखील आरोग्यविषयक समस्या उद्भवत असल्याचा दावा जिल्हा परिषदेकडून केला जात आहे. या झोळीमुळे बालकांना श्वास घेण्यास त्रास होतो. तर पुरेशी खेळती हवा उपलब्ध होत नाही. झोळीच्या कापडास आर्द्र हवामानामुळे बुरशी संसर्ग होतो, बालकांच्या हालचालीस मर्यादा येतात . याशिवाय जास्त वेळ झोळीत ठेवल्याने एकंदर बालकांच्या वाढ व विकासाला मर्यादा येत असल्याचे सांगितले जात आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून मुरबाड तालुक्यातील विशेष प्राविण्य मिळवलेल्या मुलींचा चॅम्पियन्स म्हणून गौरव यावेळी करण्यात आला...............

टॅग्स :zpजिल्हा परिषदthaneठाणे