शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

डोंबिवलीत गणेशोत्सवात ४० टन निर्माल्याचे संकलन; निर्मल युथ फाउंडेशनची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 00:09 IST

प्लास्टिक आणि घनकचऱ्याचेही केले वर्गीकरण, निर्माल्यापासून बनवणार खत

डोंबिवली : गणेशोत्सवात होणाºया जलप्रदूषणाला आळा बसावा, यासाठी शहरातील निर्मल युथ फाउंडेशनने पुढाकार घेतला. गणेशमूर्तींबरोबर निर्माल्य, सजावटीचे साहित्य व घनकचरा जलाशयांमध्ये जाऊ नये, यासाठी फाउंडेशनने सर्व विसर्जनांच्या दिवशी निर्माल्य संकलित केले. त्यानुसार, विविध ठिकाणांहून एकूण ४० टन २६० किलो निर्माल्य, २० टन १९५ किलो प्लास्टिक आणि १२ टन घनकचरा संकलित करण्यात आला. दरम्यान, निर्माल्यापासून श्री गणेश मंदिराच्या गांडूळखत प्रकल्पात खतनिर्मिती केली जाणार आहे.वाहत्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याची प्रथा आहे. परंतु, डोंबिवली शहर व त्यालगतच्या ग्रामीण भागांमध्ये विहिरी, तलाव आणि खाडीकिनारी विसर्जन सोहळा पार पडतो. यावेळी गणेशमूर्तींबरोबर निर्माल्य आणि सजावटीचे साहित्य पाण्यात विसर्जित केल्यामुळे जलप्रदूषण वाढते. शिवाय, जलचरांचा अधिवास आणि जैवविविधता धोक्यात येण्याची भीती असते. त्यामुळे विसर्जनावेळी निर्माल्य पाण्यात विसर्जित न करता ते कार्यकर्त्यांकडे द्यावे, असे आवाहन फाउंडेशनने केले होते.

गणेशोत्सवात दीड ते ११ दिवसांच्या विसर्जनाच्या दिवशी पूर्वेतील आयरेगाव तलाव तर, पश्चिमेतील कोपर तलाव, जुनी डोंबिवली गणेशघाट, रेतीबंदर गणेशघाट, देवीचापाडा, कुंभारखाणपाडा येथे फाउंडेशनने विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्थांच्या ३५० हून अधिक स्वयंसेवकांच्या मदतीने निर्माल्य संकलित केले.

साउथ इंडियन असोसिएशन आणि प्रगती महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाचे स्वयंसेवक, जी.आर. पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी, पर्यावरण दक्षता मंडळ संस्थेच्या रूपाली शाईवाले, केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी विलास जोशी, पूर्व विभागाचे स्वच्छता निरीक्षक अधिकारी विलास गायकवाड, पश्चिम विभागाचे राजेंद्र खैरे आदींचे सहकार्य त्यासाठी मिळाले, असे फाउंडेशनतर्फे सांगण्यात आले.