शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नोटीस बजावूनही राजन विचारे अन् केदार दिघे सोहळ्याला उपस्थित; मुख्यमंत्री म्हणाले, 'कारवाई करु नका'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 09:30 IST

अमृत महोत्सव देशभरात जल्लोषात साजरा होत आहे. देशभक्तीची लाट नागरिकांमध्ये उत्पन्न झाली आहे. सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

ठाणे- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाणे शहरात सुरू केलेल्या परंपरेनुसार ठाणे शहर मध्यवर्ती शिवसेना शाखेच्या प्रांगणात दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्यरात्री ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह शिंदे गटातील अनेक नेते पदाधिकारी उपस्थित होते. 

ठाण्यातील सदर कार्यक्रमापूर्वी ठाकरे गटातील ठाण्याचे खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार दिघे यांना नोटीस बजावली होती. मात्र यानंतरही राजन विचारे आणि केदार दिघे या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामुळे काही वेळासाठी तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. मात्र सुदैवानं कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली नाही.  

ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. अमृत महोत्सव देशभरात जल्लोषात साजरा होत आहे. देशभक्तीची लाट नागरिकांमध्ये उत्पन्न झाली आहे. सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसेच आनंद दिघे यांनी ही ठाण्यात परंपरा सुरू केली त्याचा आनंद होतोय, राज्यातही घराघरावर तिरंगा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. 

राजन विचारे आणि केदार दिघे यांच्या उपस्थितीबाबतही पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला. यावर ज्यांना या ध्वजारोहण समारंभासाठी उपस्थित राहायचं आहे, त्यांना येऊ द्या. राजन विचारे यांच्या समवेत कोणावरही कारवाई करू नका, असं पोलिसांनी सांगितलं असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलं. तसेच खात कोणतं आहे, या पेक्षा आपण न्याय कसा देतो, हे महत्वाचं आहे. त्यामुळे ज्या विभागाची  जबाबदारी मंत्र्यांवर दिली आहे, ते नक्कीच महाराष्ट्रातील जनतेला न्याय देतील, असंही एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणेShiv SenaशिवसेनाPoliceपोलिस