शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

क्लस्टरमुळे ठाण्याचा चेहरा बदलणार, सुनियोजित शहराकडे वाटचाल- एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 17:25 IST

शहराच्या नागरी पुनरुत्थान योजनेमुळे ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण होण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध  होणार आहे.

ठाणे - शहराच्या नागरी पुनरुत्थान योजनेमुळे ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण होण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध  होणार आहे. ठाण्याची वाटचाल सुनियोजित शहराकडे होणार असल्याने क्लस्टरमुळे शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यास मदत होणार असल्याचे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. आज दुपारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या निवासस्थानी राज्याचे सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या योजनेचे सादरीकरण करण्यात आले. या योजनेमुळे ठाणे शहराच्या विकासाला प्राधान्य देण्याची आवश्यकता असून शहराच्या विकासासाठी कसलीही तडजोड नकरण्याच्या सूचना पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी यावेळी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना दिल्या. या बैठकीला शहर व विकास नियोजन अधिकारी, क्रिसिलचे सल्लागार, शहर नियोजन व तज्ज्ञ संजय देशमुख आणि इतर अधिकारी उपस्थित होते. 

ठाणे शहरामध्ये सद्यःस्थितीत ५९०३ हेक्टर जमीन विकासासाठी उपलब्ध आहे. त्यापैकी आजमितीस नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत एकूण १२९१ हेक्टर जमिनीमध्ये क्लस्टरची योजना राबविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. म्हणजे जवळपास शहराच्या एकूण तुलनेत २२ टक्के इतकी जमीन क्लस्टर अंतर्गत विकसित करण्यात येणार असून, यामुळे शहरामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक सुविधा निर्माण होणार आहेत. यामध्ये क्रीडा, सांस्कृतिक, सुरक्षितता, दळणवळण, प्रत्येक समाजाची केंद्रे, महिला बचतगटांसाठी स्वतंत्र जागा त्याचप्रमाणे समाजाच्या सर्व दैनंदिन गरजा पुरविणारे कम्युनिटीसेंटर आदी विपुल प्रमाणात सुविधा निर्माण होणार आहेत. दरम्यान या सुनियोजित पुनरुत्थान योजनेमुळे एकूण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये जेवढ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त रोजगाराची संधी ठाणे शहरात निर्माण होणार आहे. आजमितीस मुंबईमध्ये ६९ टक्के, नवी मुंबईमध्ये १८ टक्के, मीरा, भाईंदर, वसई-विरार येथे ४ टक्के, भिवंडी, अंबरनाथ येथे ५ टक्के तर ठाणे शहरामध्ये केवळ ४ टक्के रोजगाराची संधी उपलब्ध आहेत. तथापि क्लस्टर योजनेमुळे मुंबई सोडून उर्वरित एमएमआर क्षेत्रात ५१ टक्के रोजगाराची संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या योजनेमुळे २३ हजार अतिरिक्त गृहसंकुले निर्माण होणार असून, परवडणा-या घरांच्या प्रमाणातही वाढ होणार आहे. त्यामुळे या शहरातील नागरिकांचे राहणीमान उंचावणार आहे. तसेच मुख्य शहराबरोबरच कळवा, मुंब्रा, कौसा या उपनगरांचाही विकास होणार आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे