शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्टसिटीच्या अंतर्गत ठप्प कामांचा निधी कोरोनासाठी वर्ग करा, भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 15:45 IST

कोरोनाचा सामना करण्यासाठी आणि त्यावर उपाय योजना करण्यासाठी निधी अपुरा पडणार आहे. त्यामुळे यासाठी स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांचा निधी वापरण्यात यावा अशी मागणी भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांनी केली आहे.

ठाणे : कोरोनाच्या आपत्तीच्या पाशर््वभूमीवर अत्यावश्यक खर्चासाठी महापालिकेकडून निधीची कमतरता भासवणार आहे. त्यामुळे यासाठी ठाणे स्मार्ट सिटी प्रकल्पातील संथ गतीने सुरू असलेल्या वा ठप्प कामांचा निधी वर्ग करावा अशी मागणी भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांनी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे केली आहे.           कोरोनाच्या आपत्तीने संपूर्ण जग ढवळून गेले असून, अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. २५ लाखांहून अधिक ठाणेकरांच्या उत्तम आरोग्यासाठी कोरोना आटोक्यात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. मात्र, त्यासाठी निधीची अडचण भासणार आहे. त्यामुळे हा निधी उभारण्यासाठी ठाणे स्मार्ट सिटी प्रकल्पाचे चार वर्षांपासून भिजत घोंगडे पडले आहे. त्यामुळे त्यातूनच हा निधी उभा करण्याची मागणी त्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. ठाणे शहरात केवळ अर्बन रेस्टरु म नावाने स्मार्ट टॉयलेट उभारली गेली. त्याव्यतिरिक्त बहुसंख्य कामे ठप्प आहेत. या प्रकल्पांचा निधी तूर्त कोरोना रोखण्यासाठी वापरल्यास ठाणेकरांचा फायदाच होईल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पातून हाती घेतलेले काही प्रकल्प निरर्थक असून, काही प्रकल्पांना अद्यापि मंजुरी मिळालेली नाही. तर काही प्रकल्प पर्यावरणाच्या नियमांमध्ये बंद पडले आहेत. संबंधित कंपन्यांना कार्यादेश दिल्यानंतरही, तब्बल दीड वर्षांपासून अनेक प्रकल्पांची कामे १ ते १० टक्क्यांमध्येच रखडली आहेत. ती केव्हा पूर्ण होतील, याची प्रशासनाकडेही माहिती नाही. या पाशर््वभूमीवर सध्याच्या परिस्थितीत स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या कामाला स्थगिती देऊन शिल्लक निधी कोरोना रोखण्यासाठी वर्ग करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.स्मार्टसिटी अंतर्गत २६० कोटी ८५ लाखांच्या कोपरी सॅटीसचे ४.१ टक्के काम पूर्ण, १९ कोटी ६३ लाखांच्या पदपथ सुधारणाचे ११.१ टक्के, २२ कोटी ८७ लाखांच्या कॉम्प्रेन्सिव्ह सिव्हरेज सिस्टिमचे ४.०५ टक्के, ४७ कोटी २६ लाखांच्या पाणीपुरवठा पुनर्रचनेचे ७.९४ टक्के, १२१ कोटींच्या पाण्याच्या स्मार्ट मिटरिंगचे ३८.५० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर २०४ कोटी ५४ लाख रु पयांच्या वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटमधील मुंब्रा, नागला बंदर, वाघबीळ-कोलशेत, साकेत-कळवा-कोपरी येथील कामे ५ ते २७ टक्क्यांपर्यंत काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पांचा कोट्यवधी रु पयांचा निधी शिल्लक आहे. वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटमध्ये केवळ १७ ते १८ कोटी व कोपरी सॅटीसमध्ये सुमारे साडेचार कोटी रु पये कंत्राटदाराला अदा करण्यात आले आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्पातील रखडलेल्या कामांना स्थगिती देऊन त्याचा निधी कोरोनावर उपाय योजना करण्यासाठी वर्ग करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका