स्मार्टसिटीच्या अंतर्गत ठप्प कामांचा निधी कोरोनासाठी वर्ग करा, भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 03:44 PM2020-05-11T15:44:36+5:302020-05-11T15:45:32+5:30

कोरोनाचा सामना करण्यासाठी आणि त्यावर उपाय योजना करण्यासाठी निधी अपुरा पडणार आहे. त्यामुळे यासाठी स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांचा निधी वापरण्यात यावा अशी मागणी भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांनी केली आहे.

Classify funds for coronation under SmartCity for Corona, demands of former BJP group leader Narayan Pawar | स्मार्टसिटीच्या अंतर्गत ठप्प कामांचा निधी कोरोनासाठी वर्ग करा, भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांची मागणी

स्मार्टसिटीच्या अंतर्गत ठप्प कामांचा निधी कोरोनासाठी वर्ग करा, भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांची मागणी

googlenewsNext

ठाणे : कोरोनाच्या आपत्तीच्या पाशर््वभूमीवर अत्यावश्यक खर्चासाठी महापालिकेकडून निधीची कमतरता भासवणार आहे. त्यामुळे यासाठी ठाणे स्मार्ट सिटी प्रकल्पातील संथ गतीने सुरू असलेल्या वा ठप्प कामांचा निधी वर्ग करावा अशी मागणी भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांनी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे केली आहे.
           कोरोनाच्या आपत्तीने संपूर्ण जग ढवळून गेले असून, अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. २५ लाखांहून अधिक ठाणेकरांच्या उत्तम आरोग्यासाठी कोरोना आटोक्यात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. मात्र, त्यासाठी निधीची अडचण भासणार आहे. त्यामुळे हा निधी उभारण्यासाठी ठाणे स्मार्ट सिटी प्रकल्पाचे चार वर्षांपासून भिजत घोंगडे पडले आहे. त्यामुळे त्यातूनच हा निधी उभा करण्याची मागणी त्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. ठाणे शहरात केवळ अर्बन रेस्टरु म नावाने स्मार्ट टॉयलेट उभारली गेली. त्याव्यतिरिक्त बहुसंख्य कामे ठप्प आहेत. या प्रकल्पांचा निधी तूर्त कोरोना रोखण्यासाठी वापरल्यास ठाणेकरांचा फायदाच होईल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पातून हाती घेतलेले काही प्रकल्प निरर्थक असून, काही प्रकल्पांना अद्यापि मंजुरी मिळालेली नाही. तर काही प्रकल्प पर्यावरणाच्या नियमांमध्ये बंद पडले आहेत. संबंधित कंपन्यांना कार्यादेश दिल्यानंतरही, तब्बल दीड वर्षांपासून अनेक प्रकल्पांची कामे १ ते १० टक्क्यांमध्येच रखडली आहेत. ती केव्हा पूर्ण होतील, याची प्रशासनाकडेही माहिती नाही. या पाशर््वभूमीवर सध्याच्या परिस्थितीत स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या कामाला स्थगिती देऊन शिल्लक निधी कोरोना रोखण्यासाठी वर्ग करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
स्मार्टसिटी अंतर्गत २६० कोटी ८५ लाखांच्या कोपरी सॅटीसचे ४.१ टक्के काम पूर्ण, १९ कोटी ६३ लाखांच्या पदपथ सुधारणाचे ११.१ टक्के, २२ कोटी ८७ लाखांच्या कॉम्प्रेन्सिव्ह सिव्हरेज सिस्टिमचे ४.०५ टक्के, ४७ कोटी २६ लाखांच्या पाणीपुरवठा पुनर्रचनेचे ७.९४ टक्के, १२१ कोटींच्या पाण्याच्या स्मार्ट मिटरिंगचे ३८.५० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर २०४ कोटी ५४ लाख रु पयांच्या वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटमधील मुंब्रा, नागला बंदर, वाघबीळ-कोलशेत, साकेत-कळवा-कोपरी येथील कामे ५ ते २७ टक्क्यांपर्यंत काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पांचा कोट्यवधी रु पयांचा निधी शिल्लक आहे. वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटमध्ये केवळ १७ ते १८ कोटी व कोपरी सॅटीसमध्ये सुमारे साडेचार कोटी रु पये कंत्राटदाराला अदा करण्यात आले आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्पातील रखडलेल्या कामांना स्थगिती देऊन त्याचा निधी कोरोनावर उपाय योजना करण्यासाठी वर्ग करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
 

Web Title: Classify funds for coronation under SmartCity for Corona, demands of former BJP group leader Narayan Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.