शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे आणि शिंदे गटात शाखा ताब्यात घेण्यावरून ‘सामना’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 08:57 IST

ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक 

ठाणे : ठाण्यात शिवसेनेच्या शिंदे गटाने शिवाईनगर येथील शाखा कुलूप तोडून ताब्यात घेतली. त्यानंतर ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या होत्या. दोन्ही गटांना पांगविण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. दोन्ही गटांकडून शाखेसाठी दावा केला जात असल्यामुळे येथे राज्य राखीव पोलिस दलाची कुमक तैनात करण्यात आली आहे.

राज्यभरात होळीचा उत्साह साजरा होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातच सोमवारी अनपेक्षित घडामोडी सुरू होत्या. शिवाईनगर येथील जुन्या शिवसेना शाखेचा ताबा घेण्यासाठी शिंदे गटाचे कार्यकर्ते हे साेमवारी रात्री ८ वाजता पोहाेचले होते. त्यानंतर दोन्ही गटांचे कार्यकर्ते हे एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी करीत आमने-सामने आले. शिंदे गटाने शाखेचा ताबा घेतल्यानंतर शाखेतच तळ ठोकला. त्यावेळी ठाकरे गटातील भास्कर शेट्टी यांच्यासह कार्यकर्ते घोषणा देत होते, तर दुसरीकडे शिंदे गटातील माजी नगरसेवक जेरी डेव्हिड यांच्यासह कार्यकर्ते घोषणा देत होते. तणाव वाढत असताना वर्तकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सदाशिव निकम यांनी दोन्ही गटांना तिथून जाण्याचे आवाहन केले. 

फटाक्यांची आतषबाजी आणि बाचाबाचीस्थानिक शिवसैनिक असताना शिंदे गटाने टाळा तोडून शाखा ताब्यात घेतली. सर्वोच्च न्यायालयाचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही अवमान केल्याचा आरोप ठाकरे गटाचे भास्कर  शेट्टी यांनी केला, तर ही शाखा प्रताप सरनाईक यांनी बांधलेली असून, येथील स्थानिक पदाधिकारी आमच्यासाेबत आहेत, असा दावा शिंदे गटाच्या नरेश म्हस्के यांनी केला. शाखा ताब्यात आल्यानंतर शिंदे गटाने  फटाक्यांची आतषबाजी केली. रात्री ११ च्या दरम्यान  दोन्ही गटांना पोलिसांनी पांगविल्यानंतर या वादावर पडदा पडला. दरम्यान, याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे वर्तकनगर पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना